शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

कोनसरीचा लोहखनिज प्रकल्प गुंडाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:06 IST

मुबलक प्रमाणात लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्याचे काम गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प आहे. पोलिसांकडून संरक्षण मिळत नसल्यामुळे हे काम बंद आहे. या परिस्थितीला वैतागून लॉयड्स मेटल्स कंपनी हे काम गुंडाळण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देलोहदगडाचे उत्खनन बंद : संरक्षणाअभावी कंपनी काम बंद करण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुबलक प्रमाणात लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्याचे काम गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प आहे. पोलिसांकडून संरक्षण मिळत नसल्यामुळे हे काम बंद आहे. या परिस्थितीला वैतागून लॉयड्स मेटल्स कंपनी हे काम गुंडाळण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या रुपात हजारो बेरोजगारांनी पाहिलेले रोजगाराचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.एटापल्ली तालुक्यातील सुरजागडच्या पहाडाच्या पोटात मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. त्या कच्च्या खनिजाचे शुद्धीकरण करून शुद्ध लोह काढण्याचा प्रकल्प चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे प्रस्तावित आहे. दोन वर्षापूर्वी घाईघाईने मुख्यमंत्र्यांनी येऊन त्या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. नंतर शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यापासून तर एमआयडीसीकडून ती जागा लॉयड्स मेटल्स कंपनीला हस्तांतरित करण्यापर्यंतच्या प्रक्रियेसाठी सव्वा वर्ष निघून गेले. परंतू नंतरही हे काम ठप्पच आहे.औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार अनेक उद्योजकांना विविध प्रकारे प्रोत्साहन आणि सवलती देत असताना गडचिरोलीत मात्र उलटे चित्र तयार झाले आहे. लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत कोणाकडूनच सहकार्य मिळत नसल्यामुळे हे काम पुढे चालू ठेवणे कठीण असून त्यामुळे कंपनी आपले काम गुंडाळण्याचा विचार करीत असल्याचे सूत्रांकडून समजते. दिवसाला एक हजार टन लोहदगडाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असणाºया कोनसरीच्या प्रकल्पाला तेवढा कच्चा माल नियमितपणे मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प तोट्यात जाऊ शकतो. म्हणूनच कोनसरीतील प्रकल्प उभारणीच्या कामाला कंपनीने अद्याप सुरूवात केली नसल्याचे सांगितले जात आहे.लोकप्रतिनिधींना बसणार फटका !लोहखाणीतील कच्चा माल काढण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील शेकडो मजुरांच्या हाताला काम मिळत होते. ते काम पाच महिन्यांपासून बंदच आहे. यानंतर कोनसरीतील कारखान्यात कुशल कामगारांना नियमित नोकरी लागण्याचे स्वप्नही आता भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबत बेरोजगार युवकांना ट्रकमालक बनविण्याचे स्वप्नही भंगणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.रस्त्याचे कामही ठप्पचगेल्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरजागडमधील लोहखनिज लॉयड्स मेटल्स कंपनीच्या घुग्गुस येथील लोहप्रकल्पात नेले जात होते. परंतू एका अपघाताचे निमित्त झाले आणि लोहखनिजाची वाहतूक बंद झाली. ज्या मार्गाने लोहखनिजाचे ट्रक जातात त्या मार्गाचे रूंदीकरणाचे काम तातडीने करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. त्या कामाची निविदा प्रक्रियाही आधीच झाली होती. परंतू आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या कंपनीने गेल्या सहा महिन्यात त्यासाठी लागणारी पुढची प्रक्रियाच (बँक सिक्युरिटी) केली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया अर्धवट स्थितीत पडून असून सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाला आहे.नक्षलवादी मानसिकेचा विजयविशेष म्हणजे या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण देण्यासाठी पोलीस महासंचालकांनी सुरजागड पहाडावर स्वतंत्र उपपोलीस स्टेशन मंजूर केले आहे. पण अलिकडे वाढलेल्या नक्षलवादी कारवायांमुळे पोलीस लोहखनिजाच्या कामासाठी किंवा वाहतुकीसाठी संरक्षण देण्यास तयार नाहीत. पोलीस हिमत दाखवून कोणतीही ‘रिस्क’ घेण्यास तयार नसल्यामुळे हा पोलिसांचा पराजय आणि नक्षलवादी मानसिकता ठेवणाऱ्यांचा विजय असल्याचेही बोलले जात आहे. याचा सर्वाधिक फटका बेरोजगार युवकांना बसणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस