शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्न तिथीचा पालनकर्ता कोहळी समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:17 IST

अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्देपंचांग औपचारिकता : वऱ्हाड्यांच्या नाचगाण्यांमुळे लग्न तिथीची ऐसीतैसी

प्रदीप बोडणे।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.सनई चौघडाचे मंगल सूर कानी पडताच लग्नाचा मुहूर्त जवळ आला म्हणून वधू मंडळीची एकच धावपळ सुरू होते आणि जानोश्यावर नवरदेव निघाल्याचे वृत्त धडकताच नवदेवाला ओवाळण्यासाठी आणि वराकडील मंडळीच्या स्वागतासाठी पंचआरती घेऊन सुहासिनी सज्ज असतात. परंतु वधू मंडळीला वर पोहोचायला दोन तास वेळ आहे, अशी माहिती मिळते आणि साऱ्यांचा हिरमोड होतो.लग्नपत्रिका, पंचांग मुहूर्त हे सगळे सोपस्कार भावी वधू-वराच्या मांगल्यासाठी असतील तर वराकडील मंडळीच्या नाचगाण्यामुळे लग्न तिथी टाळणे योग्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. लग्न तिथीचे तंतोतंत पालन करणारा म्हणून कोहळी समाजाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. वरातीतील नाचगाणे कितीही करा, पण मुहूर्त टळू देणार नाही आणि यासाठी कुठलीही सबब सांगू दिल्या जात नाही. वराकडील मंडळीकडून तसा प्रयत्न होत नाही. त्यामुळे भोजनावळी आटोपून पाहुणे लग्न मंडळी वेळेवर ईच्छित स्थळी पोहोचणे सोयीचे होते. इतर ठिकाणी लग्नाचा मुहूर्त सकाळी ११ वाजता आणि विवाह लागतो दुपारी. नाचणाऱ्यांच्या धिंगाण्यामुळे दोन्हीकडील पाहुणे मंडळींची गैरसोय होते.इतर समाजापुढे ठेवला आदर्शकोहळी समाजासह काही विशिष्ट समाज आजही लग्न तिथीप्रमाणे वेळेवर लग्नकार्य करीत आहेत. मात्र बहुतांश समाजातील लग्नकार्याची वेळ निश्चित नसते. सद्या जिल्हाभरात लग्नाचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यातच उष्णतेचा पारा ३३ अंशावर पोहोचला आहे. अशा तप्त उन्हात लग्नकार्यात सहभागी होणे पाहुण्यांसाठी त्रासाचे ठरते. त्यामुळे कोहळी समाजाचा इतर समाजाने आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :marriageलग्न