शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
2
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
3
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
4
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
5
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
6
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
7
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
8
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
9
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
10
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 
11
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
12
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
13
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
14
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
15
बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 
16
ट्रम्पना इतर देशांवर टॅरिफ आकारण्याचा अधिकार नाही
17
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
18
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
19
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
20
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट

छत्तीसगड सीमेवर १२ नक्षल्यांचा खात्मा, सहा तास जंगलात सुरू होते थरारनाट्य; गडचिरोलीत भीषण चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 06:07 IST

दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्यात असतानाच घडली घटना, उपनिरीक्षक जखमी

गडचिरोली : जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल परिसरात बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जवान-नक्षल्यांत चकमक उडाली. यात १२ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. उपनिरीक्षकासह दोघे जखमी झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर होते, त्याचवेळी जंगलात चकमक सुरू होती.

अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे स्टीलनिर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत हेलिकॉप्टरने आले होते. कार्यक्रम आटोपून त्यांनी जिल्हा सोडल्यानंतर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना इंटला गावाजवळ जंगलात दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला.  पोलिसांनीदेखील नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविण्यात आले असून, प्रकृती धोक्याबाहेर आहे. चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र केल्याची माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ५१ लाखांचे बक्षीस

गेल्या तीन वर्षांतील ही सर्वांत मोठी चकमक असून,

गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आहे.

त्यांनी सी-६० जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

जखमी उपनिरीक्षकाचा पाय फ्रॅक्चर

nपोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

nत्यांना हेलिकॉप्टरने नागपुरातील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

१३ नोव्हेंबर २०२१ : कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्र हद्दीतील बोटेझरी- मर्दीनटोला जंगल परिसरात पोलिस व नक्षली समोरासमोर भिडले होते. यात जवानांनी २६ नक्षल्यांना आपल्या बंदुकीचा निशाणा बनवले होते. या आठवणी बुधवारच्या चकमकीमुळे ताज्या झाल्या.

३ एके-४७ सह अनेक शस्त्रे जप्त

जवान व नक्षल्यांमध्ये सहा तास थरारनाट्य चालले. दुपारी १२ वाजेपासून सुरू झालेली चकमक सायंकाळी  ६ वाजता थांबली. त्यानंतर शोधमोहीम घेतली असता १२ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी ३ एके-४७, २ बंदुका, १ कार्बाईन, १ एसएलआर, ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे आढळून आली आहेत. यानंतर तेथे नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मृतांत विभागीय समिती सदस्य

ठार झालेल्या १२ नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. यात टिपागड (ता. कोरची) दलमच्या विभागीय समितीचा सदस्य लक्ष्मण आत्राम ऊर्फ विशाल आत्राम याचा समावेश आहे. उर्वरित ११ जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

‘त्या’ चकमकींची आठवण ताजी

यापूर्वीही जिल्ह्यात जवान व नक्षल्यांमध्ये चकमकीचे प्रसंग घडलेले आहेत. २२ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर व दामरंचा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत तब्बल ४० नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्याचवर्षी एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगलात २१ मे २०१८ रोेजी १३ नक्षल्यांचा खात्मा केला होता.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली