शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे किडनीचे नुकसान, लक्षणांकडे दुर्लक्ष नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. कोरोनातून बाहेर येण्यासाठी रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे किडनीही पूर्ण क्षमतेने काम करत नाही. ज्यांना आधीपासून मधुमेहाचा त्रास आहे किंवा किडनीशी संबंधीत आजार आहे, अशी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास किडनीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देआधीपासून त्रास असणाऱ्यांना घ्यावी लागणार विशेष काळजी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना घाबरवून सोडले. जे या दुसऱ्या लाटेत सापडून बरे झाले, त्यांना तर पुनर्जन्म झाल्याचा भास होत आहे. असे असले तरी त्यापैकी अनेकांना किडनीचा त्रास सुरू झाला आहे. कोरोनाच्या औषधोपचाराचे जे काही दुष्परिणाम समोर येत आहेत, त्यात किडनीवर होणारा परिणाम हासुद्धा एक घातक परिणाम ठरत आहे. त्यामुळे दुर्लक्ष न करता योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. कोरोनातून बाहेर येण्यासाठी रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे किडनीही पूर्ण क्षमतेने काम करत नाही. ज्यांना आधीपासून मधुमेहाचा त्रास आहे किंवा किडनीशी संबंधीत आजार आहे, अशी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास किडनीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर ज्यांना पूर्वी किडनीचा कोणाताही त्रास नव्हता, त्यांना हा त्रास सुरू झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी अनेकांची अवस्था होत आहे. काेराेना नंतर म्युकरमायकाेसिसचे रूग्ण आढळत असले तरी जिल्ह्यात त्यापेक्षाही जास्त रूग्ण किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. ते आता विविध ठिकाणी उपचार घेत आहे.

किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...- किडनीचा आजार आधीपासून असणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाल्यास त्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.- किडनी व्यवस्थित काम करत आहे की नाही याची चाचणी (किडनी फंक्शन टेस्ट) वेळोवेळी करावी.- पाणी भरपूर प्रमाणात, म्हणजे वेळोवेळी पीत राहावे. लघवी रोखून न धरता वेळीच लघवीला जावे.- कोणतीही औषधी थेट आपल्या मनाने न घेता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्टेरॉईड घेताय, डॉक्टरांना विचारले का?- कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर किंवा कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्यानंतर मनाने औषधी घेणे धोक्याचे आहे.- कोरोनाच्या उपचारात स्टेरॉईड दिले जाते, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य मात्रेनेच घेणे गरजेचे असते.- स्टेरॉईडने मधुमेह वाढू शकतो आणि मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे सावधानता गरजेची आहे.- स्टेरॉईड घेणे बंद करताना त्याचा डोस हळूहळू कमी करावा लागतो. अन्यथा त्याचे दुष्परिणाम दिसतात.

हे करा...

- दिवसातून अनेक वेळा पाणी पीत राहा. त्यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया चांगली राहते.- आंबट पदार्थ जास्त खा, त्यामुळे व्हिटॅमिन सी मिळून इन्फेक्शनचा धोका कमी होतो.- नियमित व्यायाम, फिरणे आणि पुरेशी झोप घ्या. सतत एका ठिकाणी बसून राहू नका.

हे करू नका...

- ज्या औषधांनी किडनीवर परिणाम होतो ती औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.- किडनी आणि मधुमेह हे आजार एकमेकांना पूरक असल्याने दोन्हीकडे दुर्लक्ष करू नका.- किडनीच्या आजारग्रस्तांनी हिरव्या पालेभाज्या, मांसाहार असे प्रोटीनयुक्त अन्न टाळावे.

नेफ्रॉलॉजिस्टच नाहीगडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून किडनी विकार तज्ज्ञच (नेफ्रॉलॉजीस्ट) नाही. हे पद रिक्त असल्यामुळे कोरोनाकाळात केल्या जात असलेल्या औषधोपचाराचा किडनीवर काय परिणाम होत आहे, याची तपासणी करणे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी कठीण काम बनले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं