शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही नगरपालिकेत खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:50 IST

मंगळवारी झालेल्या देसाईगंज व गडचिरोली नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीत भाजपने खांदेपालट करुन नव्या नगरसेवकांना संधी दिली. ही निवड बिनविरोध झाली.

ठळक मुद्देबिनविरोध निवड : गडचिरोलीत एकाची तर देसाईगंजात दोघांची पुनर्निवड; ज्येष्ठ व नव्यांनाही संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/देसाईगंज : मंगळवारी झालेल्या देसाईगंज व गडचिरोली नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीत भाजपने खांदेपालट करुन नव्या नगरसेवकांना संधी दिली. ही निवड बिनविरोध झाली.गडचिरोलीत दुपारी २ वाजता उपविभागीय अधिकारी नितीन सदगिर व मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या सभागृहात नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रत्येक विषय समितीच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच नाव असल्याने सर्वांची निवड अविरोध झाली. देसाईगंजमध्येही सभापती पदासाठी प्रत्येकी एकच नाव असल्याने सभापतींची निवडणूक अविरोध पार पडली. गडचिरोली पालिकेत बांधकाम समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान सभापती आनंद शृंगारपवार यांची पुनर्निवड करण्यात आली. वित्त व नियोजन समितीचे सभापती म्हणून ज्येष्ठ नगरसेवक संजय मेश्राम यांची निवड झाली. पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणून प्रवीण वाघरे, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बालकल्याण सभापती म्हणून रंजना गेडाम यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्याकडे आरोग्य समितीचे सभापतीपद कायम ठेवण्यात आले. स्थायी समितीच्या सदस्यपदी नगरसेवक भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे व प्रशांत खोब्रागडे यांची निवड झाली.निवडणुकीनंतर आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर आदींनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पहार घालून कौतुक केले.गेल्या काही दिवसांपासून कामे होत नसल्याच्या कारणावरुन बहुतांश नगरसेवक नाराज होते. अशातच सभापतीपदाची निवडणूक येऊन ठेपल्याने नगरसेवकांची नाराजी टोकाला पोहचली होती. मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते व अन्य ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुन कौशल्याने मतभेद मिटविल्याने आजची सभापती पदाची निवडणूक अविरोध पार पडली. गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. विशेष म्हणजे बºयाच वर्षानंतर भाजपला या दोन्ही नगर पालिकेचे सत्तासूत्रे सांभाळण्याची संधी मिळाली.