शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

उत्सव शांततेत पार पाडा

By admin | Updated: August 27, 2014 23:29 IST

गणेशोत्सवात समाजातील सलोखा, सद्भाव टिकून राहण्यासाठी व अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्ह्यातील मंडळांनी गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा पोलीस

जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक : पोलीस अधीक्षकांचे आवाहनगडचिरोली : गणेशोत्सवात समाजातील सलोखा, सद्भाव टिकून राहण्यासाठी व अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्ह्यातील मंडळांनी गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक बुधवारी गडचिरोली पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. जिल्हास्तरीय शांतता बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे, नगराध्यक्ष निर्मला मडके, मुख्याधिकारी रवींद्र ढाके, गडचिरोलीचे ठाणेदार उमेश बेसरकर, आरमोरीचे ठाणेदार महेंद्र मोरे, देसाईगंजचे ठाणेदार अण्णासाहेब मांजरे, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल खेवले, नामदेवराव गडपल्लीवार, सुरेश पद्मशाली उपस्थित होते. जिल्ह्यात शेकडो गणेश मंडळामार्फत गणेशाची स्थापना केली जाते. उत्सवातील १० दिवस दरम्यान गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी संबंधीत गणेश मंडळाची आहे. रात्रीच्या सुमारास गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांनी स्वत: पुढाकार घेऊन गावात सुव्यवस्था राखावी, असेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शांतता बैठकीदरम्यान सांगितले. गणेशाच्या स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंतच्या काळात प्रत्येक गणेश मंडळांनी ध्वनीक्षेपकाची मर्यादा ६० डेसीबलच्या आत ठेवावी, ध्वनीक्षेपकामुळे स्थानिक लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही संदीप पाटील यांनी केले.शांतता बैठकीला जिल्हाभरातून आलेल्या तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, गाव शांतता समितीचे पदाधिकारी व पोलीस पाटलांनी गणेशोत्सवादरम्यान गावात उद्भवणाऱ्या अनेक समस्या पोलीस अधीक्षकांपुढे मांडल्या. यावेळी डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, उत्सवादरम्यान गावात होणारी अवैध दारूविक्री, जुगार यासह अनेक समस्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांपुढे मांडल्या. गणेशोत्सवादरम्यान गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी गणेश मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला पोलीस अधीक्षकांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रत्युत्तरात दिला. अनुचित प्रकार घडविणाऱ्या मंडळावर १ लाख रूपयाचा दंड व ५ वर्षापर्यंतचा कारावास असल्याची माहिती ठाणेदार उमेश बेसरकर यांनी शांतता बैठकीदरम्यान दिली. प्रास्ताविकातून एसडीपीओ डॉ. राहूल खाडे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन पवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)