शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

कमल हिडामी रक्षक दल सदस्य

By admin | Updated: August 30, 2015 01:15 IST

२५ आॅगस्ट रोजी मंगळवारी विशेष कृती दलाचे जवान कोरची तालुक्यातील मुरकुटी परिसरात नक्षल शोध मोहीम राबविताना सायंकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली.

पोलिसांची माहिती : सीपीआयकडून पोलीस कारवायांवर प्रतिबंधाचा प्रयत्नगडचिरोली : २५ आॅगस्ट रोजी मंगळवारी विशेष कृती दलाचे जवान कोरची तालुक्यातील मुरकुटी परिसरात नक्षल शोध मोहीम राबविताना सायंकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत कमल हिडामी हा जखमी झाला होता. जखमी अवस्थेत शस्त्रासह अटक झालेला कमल हिडामी हा देखील नक्षल संघटनेमध्ये एरिया रक्षक दल सदस्य असल्याचे रेकॉर्ड व माहिती पोलीस विभागाकडे आहे. त्यामुळे कमल हिडामी हा नक्षल संघटनेमध्ये एरिया रक्षक दल सदस्य आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस विभागाने दिली आहे. दिवसेंदिवस कमजोर होत चाललेल्या नक्षल चळवळीला गतवैभव मिळावे या उद्देशाने नक्षली नेते नवनवी रणनीती वापरत आहे. ज्यात नक्षल संघटनमधील ग्रामस्तराचे संघटन सदस्यांना नक्षल दलमच्या सुरक्षा व्यवस्थेकरिता साध्या वेशात ठेवून गुप्त वार्ता संग्रह, येणाऱ्या जाणाऱ्या इसमांवर तसेच पोलीस हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी या सदस्यांचा वापर करीत असतात. प्रसंगी नक्षल दलम पोलीस पथक मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्यावर हल्ला चढविणे तसेच पोलीस कारवायांवर प्रतिबंध आणावयाच्या दृष्टीने साध्या वेशातील नक्षली व संघटन सदस्य रणनीती वापरत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत, असेही पोलिसांनी सांगितले आहे. मुरकुटी जंगल परिसरातील नक्षल चकमकीदरम्यान जखमी झालेला कमल हिडामी हा घटना घडली त्यावेळी सदर परिसरात साध्या वेशात शस्त्रासह नक्षल दलमसोबत काम करीत होता, असेही पोलिसांनी म्हटले आहे. फ्रन्टल आॅर्गनायझेशन जखमी कमल हिडामी याच्याविषयी जी काही तथ्ये पुढे करीत आहे, ते निराधार असल्याचे घटनेचे स्वरूप पाहता वाटत आहे. तपासाअंती या मुद्याची वस्तूस्थिती निश्चितच पुढे येणार आहे. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) हा सशस्त्र नक्षलवादी ग्रुप बंदुकीच्या जोरावर राज्यसत्ता हस्तगत करण्यासाठी हिंसक कारवाया करीत आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)