शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरांसोबत दुर्गम वस्त्यांमधील महिलांना न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

आदिवासी वस्त्यांमधील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. जिल्ह्यात अहेरी, गडचिरोली, चामोर्शी व देसाईगंज या चार ठिकाणी समुपदेश केंद्र आहे. सन २०२०-२१ पासून आजपर्यंत ४६६ तक्रारी आल्या आहेत. मनोधैर्य योजनेतून ११३ पीडितांची नोंद झालेली आहे. पैकी ९२ प्रकरणे मंजूर आहेत. त्यातील ८६ प्रकरणांमध्ये २ कोटी २ लाख रुपये अर्थसहाय्य दिले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य महिलांसाठी खऱ्या अर्थाने सुरक्षित करण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊया. शासन, प्रशासन, पोलीस आणि महिलांच्या विषयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडून महिलांवरील अत्याचार रोखता येतील. यासाठी फक्त जनजागृती व लोकप्रतिनिधींनी जनचळवळ उभी करणे अपेक्षित आहे. केवळ शहरीच नाही, तर दुर्गम वस्त्यांमधील महिलांनाही न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी गडचिरोलीत दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘महिला आयोग आपल्या दारी’ या कार्यक्रमात उपस्थित महिलांना उद्देशून त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे महिला आयोग स्थापन झाल्यापासून गडचिरोली येथे जनसुनावणी घेण्याचा हा पहिलाच योग होता. यावेळी स्वागत समारंभाला आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीना उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर आयोगाच्या अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जनसुनावणी झाली. आदिवासी वस्त्यांमधील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. जिल्ह्यात अहेरी, गडचिरोली, चामोर्शी व देसाईगंज या चार ठिकाणी समुपदेश केंद्र आहे. सन २०२०-२१ पासून आजपर्यंत ४६६ तक्रारी आल्या आहेत. मनोधैर्य योजनेतून ११३ पीडितांची नोंद झालेली आहे. पैकी ९२ प्रकरणे मंजूर आहेत. त्यातील ८६ प्रकरणांमध्ये २ कोटी २ लाख रुपये अर्थसहाय्य दिले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जनसुनावणीदरम्यान,  प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर व अविनाश गुरनुले यांनी तर संचालन प्रियंका आसूरकर यांनी केले. 

१०२ प्रकरणे प्रलंबितजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे १३२ प्राप्त प्रकरणांमध्ये २३ मंजूर आणि १३ नामंजूर करण्यात आले. मात्र, १०२ प्रकरणे प्रलंबित आहेत. ती का प्रलंबित आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे यावेळी चाकणकर यांनी सांगितले. उर्वरित १४ प्रकरणांत यापूर्वीच १७ लक्ष ५० हजार रुपये अर्थसहाय्य अदा केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  

‘शक्ती’ कायद्याला मंजुरी मिळेलआयोगाच्या अध्यक्षांनी जनसुनावणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाच्या उपक्रमांबाबत व गडचिरोलीतील महिला तक्रारींबाबत माहिती दिली. राज्यात हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला जात आहे. गेल्या काही काळात कोरोनामुळे महिलांवरील अत्याचार, बालविवाह जास्त झाल्याची नोंद आहे. याचे कारण अर्थिक अडचणी, नैराश्य असल्याचे आढळून येत आहे. यासाठी  समुपदेशन केंद्र प्रशासनाच्या मदतीने गतीने कार्य करीत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती या नवीन कायद्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

११४ तक्रारी दाखल, २ मध्ये समझोता-    गडचिरोलीत जनसुनावणीत ११४ वेगवेगळी प्रकरणे दाखल झाली. त्यामध्ये महिला तक्रार निवारण केंद्राच्या ५० तक्रारी होत्या, तर कोरोना काळात एकल विधवा  महिलांच्या विविध योजना व सानुग्रह अनुदान याबाबत ६४ तक्रारी होत्या.  तसेच वात्सल्य योजनेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने सोडविण्यासाठी संबंधितास सूचना करण्याचे आश्वासन दिले. प्राप्त   प्रकरणांतील २ प्रकरणांत समझोता करण्यात यश आले. तसेच ८ प्रकरणांत गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले. 

 

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकर