शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मार्कंडादेव यात्रा दारू व खर्रामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:54 IST

चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यंदा सलग तिसऱ्या वर्षीही दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. मुक्तिपथच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने कडेकोट बंदोबस्त आणि विविध उपक्रमांद्वारे ही यात्रा नशामुक्त झाली.

ठळक मुद्देपावित्र्य अबाधित : मुक्तिपथ, ग्रामपंचायत, मंदिर व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यंदा सलग तिसऱ्या वर्षीही दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. मुक्तिपथच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने कडेकोट बंदोबस्त आणि विविध उपक्रमांद्वारे ही यात्रा नशामुक्त झाली.दरवर्षी महाशिवरात्रीला जिल्ह्यासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोक आस्थेने येथे दर्शनासाठी येतात. पण दर्शनासाठी येतानाही तोंडात खर्रा आणि पोटात दारू ढोसून येणाऱ्यांचे प्रमाण येथे काही वर्षांपूर्वी लक्षणीय होते. यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग पावत होते. यंदा तिसºया वर्षीही यात्रा नशामुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाद्वारे पानठेलाधारकांना तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुक्तिपथद्वारे ४० व्यसनमुक्ती स्वयंसेवक नेमण्यात आले होते. बाहेरून खर्रा घेऊन येणाऱ्यांची दर्शनाच्या रांगेत तपासणी करून खर्रा असल्यास तो जप्त करण्यात आला. तसेच खर्रा आत नेऊन मंदिराचे पावित्र्य भंग न करण्याचे आवाहन करीत ‘मी खरार्मुक्त आहे’ असा संकल्प असलेला बिल्लाही देण्यात आला. सोबतच स्वयंसेवकांद्वारे रोज दोन वेळा जनजागृती रॅली काढून व्यसनमुक्तीचे आवाहन लोकांना करण्यात आले. विशेष म्हणजे दोन वर्षे यात्रा सलग दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे एकूणच या वर्षी नशायुक्त पदार्थांचे प्रमाण खूप कमी आढळून आले.सलग चार दिवस चाललेल्या या उपक्रमात गोळा झालेला खर्रा व इतरही साहित्याची गुरुवारी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, मुक्तिपथचे संचालक मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, मार्र्कंडादेव येथील सरपंच उज्वला गायकवाड, ग्रामसेवक दिनेश सराटे, यात्रा अधीक्षक डी. टी. भोगे, देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, व्यवस्थापक जनार्दन जुनघरे आदी उपस्थित होते. मंदिरापासून बसस्थानकापर्यंत ही अंत्यात्रा नेऊन हा साठा जाळून नष्ट करण्यात आला.खर्रा न विकणाऱ्या पानठेलाधारकांचा सत्कारयात्रा काळात नियमांचे पालन करून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचा निर्धार पानठेलाधारकांनी केल्याने ही यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त झाली. या कृतीची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. नियमांना बगल देत काही पानाठेलाधारकांनी खर्रा विकण्याचा प्रयत्न केला. अशांना ग्रामपंचायतद्वारे लवकरच नोटीस दिली जाणार आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी