शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीचा प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:03 IST

राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली असून सदर भाडेवाढ १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राहणार आहे.

ठळक मुद्दे१० टक्के हंगामी वाढ : १४ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान तिकीटचे दर वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली असून सदर भाडेवाढ १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राहणार आहे.बहूतांश नागरिक दिवाळी सण आपल्या मूळगावी आप्तेष्टांसोबत साजरा करतात. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाºयांची संख्या वाढते. वाढलेल्या गर्दीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने साधी, जलद, रात्रसेवा बसेसच्या तिकीटात १० टक्के वाढ केली आहे. तर निमआरामच्या तिकीटात १५ टक्के व वातानुकूलीत बसच्या तिकीटात २० टक्के वाढ केली आहे. गडचिरोली विभागातील अहेरी, गडचिरोली, ब्रह्मपुरी या तीन आगारातील बसेस दरदिवशी ८८ हजार किमी धावतात. त्यापासून विभागाला दरदिवशी १८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीच्या हंगामात दरदिवशी तीन हजार किमीची भर पडेल. यासाठी एसटी विभागाने नियोजन केले आहे. त्याचबरोबर दरदिवशी २१ लाख रूपये उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत तीन कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज आहे.दिवाळी सणादरम्यान येणाºया भाऊबिज सणामुळेही प्रवाशांची गर्दी वाढते. गडचिरोली जिल्ह्यात खासगी वाहनांची संख्या कमी असल्याने स्थानिक प्रवाशांनाही बसवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील बसफेºयांबरोबरच जिल्ह्याअंतर्गतच्या फेºया वाढविण्याचेही नियोजन गडचिरोली विभागाने केले आहे. ऐन दिवाळीच्या सणादरम्यान भाववाढ केल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.मुख्य मार्गावर अधिक भरचंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदी मुख्य मार्गांवर गर्दी राहत असल्याने या मार्गांवर अधिकाधिक फेºया चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, आष्टी, सिरोंचा आदी मार्गांवरही बसफेºया वाढविल्या जाणार आहेत. शाळांना सुट्या असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस यासाठी कामी येणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक एसटीला भाववाढ केली असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांनाही भाववाढीचा चटका सहन करावा लागणार आहे. वाढीव फेºयांमुळे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.चंद्रपूर मार्गावर यापूर्वी ४० बसफेºया जलद व १७ बसफेºया सर्वसाधारण होत्या. मात्र प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ४९ बसफेºया सर्वसाधारण केल्या असून ८ बसफेºया जलद आहेत.