लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरातून काळागोटा वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारक व पादचाऱ्यांना चिखल व खड्ड्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डांबर उखडल्याने या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहते व त्यामुळे या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डबक्यांमुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्गालगत असलेल्या घरातील नागरिकांना दिवस-रात्र घरासमोरील चिखल तुडवित वाट काढावी लागते. या मार्गावरील नरेंद्र निंबेकर यांच्या घरासमोर संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता नेमका कोणत्या बाजूने चांगला आहे हे कळायला मार्ग नाही. दरवर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्याची अशीच स्थिती असते.गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डे खोल असल्याने खड्ड्यातील पाणी वाहून जात नाही. संपूर्ण रस्ता चिखलाने माखला असल्याने पादचाºयांना चिखल तुडवित आवागमन करावे लागत आहे. दिवसभर या रस्त्यावर लोकांचे आवागमन सुरू असते. मात्र न. प.चे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी काळागोटा परिसरातील नागरिकांनी केली आहे.नवेगावच्या साईनगरात चिखलाचे साम्राज्यगडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील साईनगर वॉर्डातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. या चिखलाच्या रस्त्याने जाताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने या वॉर्डात कच्चा रस्ता तयार केला. या मार्गावर एचपी गॅसचे गोदाम आहे. या गोदामात ट्रकने सिलिंडर नेले जातात. वजनी ट्रकमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच चिखलही निर्माण झाले आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाची रिपझिप सुरू आहे. यामुळे चिखलाचे प्रमाण आणखी वाढले आहे. चिखल एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे की, पायदळ चालणे कठीण झाले आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पक्का रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात प्रशासनाने नियोजन करून रस्ता दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे.
काळागोटा मार्गावरून चिखल व खड्ड्यातून सुरू आहे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST
आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डांबर उखडल्याने या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे.
काळागोटा मार्गावरून चिखल व खड्ड्यातून सुरू आहे प्रवास
ठळक मुद्दे आरमोरी नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष : पाच वर्षापूर्वी केलेले डांबरीकरण अल्पावधीत उखडल्याने वाहनधारकांना त्रास