शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड-कोठी मार्गाचा प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:28 IST

भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात अद्यापही कायम आहेत. प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोठी परिसर विकासापासून आजही कोसोदूर आहे.

ठळक मुद्देडांबरीकरण उखडले : खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली; १७ वर्षांपासून मार्गाची पक्की दुरूस्ती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात अद्यापही कायम आहेत. प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोठी परिसर विकासापासून आजही कोसोदूर आहे. त्यातल्या त्यात भामरागड-कोठी या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मार्गाचा नागरिकांचा प्रवास खडतर बनला आहे.रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. खड्डे बुजवून रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी सातत्याने लावून धरली. मात्र रस्ता दुरूस्तीच्या कामात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सन १९९९-२००० या आर्थिक वर्षात प्रशासनाच्या वतीने कोठी मार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र तेव्हापासूून या रस्त्याची आजवर एकदाही पक्की दुरूस्ती करण्यात आली नाही. सदर मार्गाच्या निर्मितीला आज १७ वर्ष पूर्ण होत असले तरी या रस्त्याच्या पुनर्जीवनाकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.या रस्त्याचे कामही त्यावेळी दर्जेदार झाले नाही. त्यामुळे २०१२ मध्येच हा रस्ता पुरामुळे वाहून गेला. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने हे खड्डे चुकवित वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.भामरागड तालुक्यात नदी, नाल्यांची संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी छोटे-मोठे पूलही बांधण्यात आले आहे. मात्र नाल्यावरील जुन्या पुलाच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्य्ोाने चार-पाच वर्षांत पुरामुळे अनेक लहान पूल वाहूून गेले आहेत. भामरागड-कोठी मार्गाची अवस्था दयनिय झाल्याने या मार्गावरील महामंडळाची बसफेरी बंद होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी अनेकदा बसफेरी बंद झाली होती.प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना भामरागड भागात पोहोचेनाभामरागड-कोठी या मार्गाची गतवर्षीही प्रचंड दूरवस्था झाली होती. कोठी पोलीस मदत केंद्राच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मार्गावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्यात आले होते. तसेच महामंडळाची बसफेरी सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावाही करण्यात आला. त्यामुळे सध्या या मार्गावर बसफेरी सुरू आहे. मात्र येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास कोठी मार्गाची पूर्णत: वाट लागणार आहे. खासगी वाहतूकही बंद होण्याची शक्यता आहे.एका गावाला दुसरे गाव व एका शहराला दुसरे शहर जोडण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत कोट्यवधी रूपयांची कामे शहरी भागात केली जात आहेत. मात्र भामरागड तालुक्यात गरज असूनही कोठीे मार्गाचे काम या योजनेतून मंजूर करण्यात आले नाही. सदर दोन्ही योजना या भागात पोहोचल्याच नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRainपाऊस