शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

100 किमीच्या प्रवासासाठी लागतात तब्बल चार तास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

चार वर्षांपूर्वी आलापल्ली ते सिरोंचा मार्गाची नव्याने बांधणी झाली. पण गेल्या दोन वर्षात झालेला अतिपाऊस आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची स्थिती खूपच गंभीर झाली आहे. आजारी नागरिक आणि गरोदर माता यांच्यासाठी या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.  सध्या महामार्ग प्राधीकरणाने या मार्गाची डागडुजी सुरू केली असली तरी या महामार्गाची पुनर्बांधणी करणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : गर्भवती महिलांसह रूग्णांना जीवघेणा त्रास

  विवेक बेझलवारलाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्ह्यात सध्या सर्वाधिक खराब आणि चर्चेचा विषय झालेला रस्ता म्हणजे आलापल्ली ते सिरोंचा हा आहे. या मार्गावरून जाताना हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे असे कोणाला सांगितले तर विश्वास बसणे कठीण आहे. या १००    किलोमीटरच्या मार्गात आता रस्ता कमी आणि खड्डेच जास्त असल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा हे जेमतेम दोन ते अडीच तासाचे अंतर पार करण्यासाठी सध्या ४ तास लागत आहेत. चार वर्षांपूर्वी आलापल्ली ते सिरोंचा मार्गाची नव्याने बांधणी झाली. पण गेल्या दोन वर्षात झालेला अतिपाऊस आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची स्थिती खूपच गंभीर झाली आहे. आजारी नागरिक आणि गरोदर माता यांच्यासाठी या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. सध्या महामार्ग प्राधीकरणाने या मार्गाची डागडुजी सुरू केली असली तरी या महामार्गाची पुनर्बांधणी करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी येत असलेल्या विविध अडचणी तातडीने दूर करण्यासाठी सर्व लाेकप्रतिनिधींनी सरकारदरबारी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आलापल्लीनंतर मोसमपासून पुढे ३५ किमी मार्गाच्या रुंदीकरण व पुनर्बांधणीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यापुढे सिरोंचापर्यंतच्या कामासाठीही प्रस्ताव गेला आहे. पण वन कायद्याच्या अडचणींमुळे हे काम सुरू झालेले नाही. या अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.- सारंग गोगटे, सहायक अभियंता, महामार्ग प्राधीकरण आलापल्ली

अवजड वाहनांचा प्रवासआलापल्ली-सिरोंचा मार्गावर छत्तीसगड आणि तेलंगाना राज्यासाठी तीन आंतरराज्यीय पूल निर्माण झाल्याने दक्षिणेकडून येणारी अवजड वाहने टोल टॅक्स वाचवण्यासाठी याच मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

पर्यटकांच्या भेटी मंदावल्याविदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलंगणातील कालेश्वर मंदिरात भाविकांची वर्षभर वर्दळ असते, परंतु महामार्गाच्या दुरवस्थेमुळे भाविकांसह कमलापूर हत्ती कॅम्प,  गिधाडांच्या विणीचे ठिकाण, सिरोंचाचे ब्रिटिशकालीन विश्रामगृह, वडधम जीवाष्म पार्क, सोमनूर संगमला येणारे पर्यटक ९० टक्क्यांनी कमी झाले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा