मौल्यवान गौण वनोपज नष्ट : मजूर रोजगारापासून वंचितवैरागड : वडसा वन विभागांतर्गत वडसा परिक्षेत्राच्या वतीने आरमोरी, कुरखेडा, कोरची व वडसा अशा चार ठिकाणी कॅम्पांतर्गत मिश्र रोपवनाचे काम सुरू आहे. मानवीकृत मिश्र रोपवन तयार करण्याच्या कामात वनाधिकाऱ्यांनी मनमर्जी करून जेसीबीचा वापर सुरू केला आहे. दरम्यान मिश्र रोपवनाची जागा तयार करण्यासाठी नैसर्गिकरित्या वाढलेले जंगल नष्ट केले जात असल्याने मौल्यवान गौण वनोपजाची मोठी हानी होत आहे.गावालगतच्या पडिक जागेकडे दुर्लक्षवडसा वन विभागांतर्गत आरमोरी वन परिक्षेत्रात गावालगत वन विभागाच्या माालकीच्या अनेक ठिकाणी पडिक जमिनी आहेत. या जागेवर अनेक नागरिक अतिक्रमण करीत आहेत. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या पडिक जागेवर चांगल्याच प्रकारचे मानवीकृत मिश्र रोपवन तयार होऊ शकते. मात्र वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नैसर्गिकरित्या वाढलेला जंगल तोडून मिश्र रोपवनाच्या नावाखाली मौल्यवान वनसंपदा नष्ट करीत आहेत. वन विभागाच्या पडिक जमिनीचे अनेक प्रकरणे थंडबस्त्यात आहेत. एकूणच वन विभाग निधीची वासलात लावत आहे.
मिश्र रोपवनाच्या चार कामात जेसीबीचा वापर
By admin | Updated: March 9, 2016 02:27 IST