शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सासूची हत्या करून पळून गेलेल्या जावयाला पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

हत्येची ही घटना पुराडा पोलीस ठाण्यांतर्गत कोटलडोह येथे गेल्या १८ जुलै रोजी घडली होती. मृतक तुळजाबाई मंगू कल्लो (६० वर्ष) ही कोरची तालुक्यातील मोहगावची रहिवासी होत. ती आरोपी आसारामची सासू आणि आत्याही होती. ती मुलीकडे आली असताना जावयासोबत शेतजमिनीच्या शाब्दिक वाद झाला. त्यातूनच आसारामने तिला बेदम मारहाण करून संपविले. तेव्हापासून तो फरार होता.

ठळक मुद्देशेतजमिनीच्या वादातून हत्या, लाकडी पाटीने केले होते डाेक्यावर व पाठीवर वार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतजमिनीच्या वादातून स्वत:च्या सासूच्या डोक्यावर, पाठीवर, हातपायांवर लाकडी पाटीने वार करून तिला जीवे मारणाऱ्या आणि नंतर फरार झालेल्या जावयाला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आसाराम बिजाराम कुमरे रा.कोटलडोह, ता.कुरखेडा असे या आरोपीचे नाव आहे. हत्येची ही घटना पुराडा पोलीस ठाण्यांतर्गत कोटलडोह येथे गेल्या १८ जुलै रोजी घडली होती. मृतक तुळजाबाई मंगू कल्लो (६० वर्ष) ही कोरची तालुक्यातील मोहगावची रहिवासी होत. ती आरोपी आसारामची सासू आणि आत्याही होती. ती मुलीकडे आली असताना जावयासोबत शेतजमिनीच्या शाब्दिक वाद झाला. त्यातूनच आसारामने तिला बेदम मारहाण करून संपविले. तेव्हापासून तो फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूरच्या खापरी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पाे. निरीक्षक उल्हास भुसारी, गौरव गावंडे, उपनिरीक्षक दीपक शेळके यांच्या सहकार्याने स.पो.निरीक्षक विक्रांत सगणे, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

गावालगतच्या जंगलात, पहाडावर काढले दिवसस्वत:ची आत्या असलेल्या सासूचा खून करून फरार झालेला आरोपी आसाराम कुमरे अटक टाळण्यासाठी गावाशेजारच्या जंगलात, पहाडी भागात वास्तव्यास होता. त्यानंतर तो कामाच्या शोधात नागपूरला गेला. याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला पोलिसांनी अलगद उचलले. सदर आरोपीवर यापूर्वीही काही गंभीर गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संपत्तीच्या लालचेने झाली मती भ्रष्टया प्रकरणातील आराेपीचे वर्तन गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. संपत्तीसाठीच त्याने सासूची हत्या केल्याचे दिसून येते. पण प्रत्यक्षात त्याने केलेल्या कृतीमुळे त्याला जेलमध्ये जावे लागले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस