लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा जलभूमी अभियानाअंतर्गत गडचिरोली तालुक्यातील पारडी (कुपी) येथे तलाव खोलीकरण व बंधाºयाचे काम पूर्ण झाले. स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी मंगळवारला राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सराड व तलावाचे जलपूजन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर, गडचिरोली पालिकेच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जवळेकर आदी उपस्थित होते.महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी अभियानाअंतर्गत पारडी (कुपी) येथील सराड व तलावातील गाळ काढण्यात आले. सिंचनाच्या दृष्टीने पाणीसाठा अधिक होण्याकरिता या बंधाºयाचा उपयोग होणार आहे. सराडातील गाळ काढण्याकरिता ६८ लाख ८२ हजार रूपये खर्च झाले. सराडाची लांबी १३०० मीटर असून सरासरी रूंदी ३५ मीटर आहे.तलावातील गाळ काढण्याच्या कामावर ६४ लाख ९५ हजार ३०० रूपयांचा खर्च झाला. तलावातील बुडीत क्षेत्र ५.३९ हेक्टर इतके आहे. गाळ काढल्यामुळे या तलावात ३१.५० टीसीएम ऐवढा पाणीसाठा वाढला आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाºयावर ५ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. जलपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पारडी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:33 IST
महात्मा जलभूमी अभियानाअंतर्गत गडचिरोली तालुक्यातील पारडी (कुपी) येथे तलाव खोलीकरण व बंधाºयाचे काम पूर्ण झाले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन
ठळक मुद्देपारडी (कुपी) येथे कार्यक्रम : गाळ काढल्याने तलावात पाणीसाठा वाढला