शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सात लाख रुपयांचा गुळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

ट्रकमधून उतरविलेला संपूर्ण गुळ जप्त केला. तसेच मोती किराणा दुकानदाराच्या गोदामात साठवून ठेवलेला १०० पेट्या गुळ जप्त केला. या संपूर्ण गुळाची किंमत जवळपास सहा लाख रुपये एवढी होते. रात्री उशीरापर्यंत गुळाचे मोजमाप व गुन्हा दाखल करण्याची कारवाई मुलचेरा पोलिसांमार्फत सुरू होती. एमएच ४०, एके ५९५३ क्रमांकाच्या ट्रकने गुळाची वाहतूक करण्यात आली.

ठळक मुद्दे९०० पेट्या ताब्यात : आलापल्ली, मुलचेरा, सुंदरनगरात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली/मुलचेरा : गोपनिय माहितीच्या आधारे मुलचेरा पोलिसांनी किराणा दुकानांवर तसेच अहेरी पोलिसांनी आलापल्ली येथील एका नागरिकाच्या घरी धाड टाकून जवळपास ९०० पेट्या गुळ जप्त केला आहे.ट्रकने गुळ आणून तो सुंदरनगर येथील दुकानांमध्ये उतरविला जात असल्याची गोपनिय माहिती मुलचेरा पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी सुंदरनगर गाठले असता, एका दुकानात गुळ उतरविला जात असल्याचे दिसून आले. तसेच ट्रक चालकाकडे असलेल्या यादीवरून सदर गुळ सुंदरनगर येथील शहा किराणा, गणेश किराणा, मथुरानगर येथील विकास किराणा, मित्र किराणा, कोपरअल्ली येथील श्रुती किराणा, मुलचेरा येथील मोती किराणा येथे गुळ उतरविला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार या दुकानांची तपासणी केली असता, या दुकानांमध्ये जवळपास ८०० पेट्या गुळ आढळून आला. एका पेटीत २० किलो गुळ राहते. या २० किलो गुळाची किंमत ७५० रुपये एवढी होते. संपूर्ण ट्रकमध्ये जवळपास ६०० ते ६५० पेट्या गुळ वाहून नेता येते. ट्रकमधून उतरविलेला संपूर्ण गुळ जप्त केला. तसेच मोती किराणा दुकानदाराच्या गोदामात साठवून ठेवलेला १०० पेट्या गुळ जप्त केला. या संपूर्ण गुळाची किंमत जवळपास सहा लाख रुपये एवढी होते. रात्री उशीरापर्यंत गुळाचे मोजमाप व गुन्हा दाखल करण्याची कारवाई मुलचेरा पोलिसांमार्फत सुरू होती. एमएच ४०, एके ५९५३ क्रमांकाच्या ट्रकने गुळाची वाहतूक करण्यात आली. या ट्रकवर श्रीकृष्ण रोडवेज चामोर्शी व न्यू जीवानी रोडवेज गडचिरोली असे लिहिले आहे.सदर कारवाई मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मिलिंद पाठक, पोलीस उपनिरिक्षक एम. पी. नैताम, सहायक पोलीस उपनिरिक्षक विनायक किरंगे, नाईक पोलीस देवेंद्र बांबोळे, प्रमोद गौरकार यांच्या पथकाने केली.आलापल्ली येथे आढळला ९४ पेट्या गुळआलापल्ली : येथील स्वामी सारकेवार याच्या घरी मोठ्या प्रमाणात गुळ साठविला असल्याची माहिती मुक्तीपथ चमुने अहेरी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता, त्यामध्ये ९४ पेटी गुळ आढळून आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुळाचा वापर दारू काढण्यासाठी केला जाते. त्यामुळे पोलिसांनी सारकेवार याच्या विरूध्दात गुन्हा दाखल करून गुळ ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या गुळाची किंमत १ लाख २५ हजार ९५० रुपये एवढी होते. आलापल्ली येथे ट्रकच्या सहाय्याने गुळ उतरवून सदर गुळ अहेरी, सिरोंचा तालुक्यातील दारू काढणाऱ्या व्यक्तींना पुरविला जाते. सदर कारवाई पोलीस निरिक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विनायक पाटील, ए. आर. नरोटे, मुक्तीपथ संघटक केशव चव्हाण, मारोती कोलावार यांनी केली.

टॅग्स :Policeपोलिस