कायद्यावर शिबिर : यू. एन. पदवाड यांचे प्रतिपादनगडचिरोली : लोकांमध्ये साक्षरतेबरोबरच चिकित्सकवृत्ती निर्माण झाली पाहिजे, नागरिकांना आपले हक्क, अधिकार, कर्तव्य यांची माहिती होणे आवश्यक आहे. कायदेविषयक साक्षरतेतूनच सजग समाज निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एन. पदवाड यांनी केले. राज्यसाधन केंद्र पुणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या विद्यमाने येवली ग्रामपंचायतीअंतर्गत गोविंदपूर येथे गुरूवारी कायदेविषयक साक्षरता शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीचे दिवाणी न्यायाधीश टी. के. जगदाळे, अॅड. सचिन कुंभारे, अॅड. विजय न्यालेवार, गटविकास अधिकारी पचारे, नायब तहसीलदार भुरसे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजपयोगी विविध कायदे व योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला येवलीच्या सरपंच गीता सोमनकर, सांसद आदर्श ग्राम येवलीचे अध्यक्ष विलास भांडेकर, राज्यसाधन केंद्र पुणेचे डॉ. अमोल वाघमारे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. संचालन विजय सोमनकर यांनी केले तर आभार येमाजी पिपरे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
कायद्याच्या साक्षरतेतूनच सजग समाज निर्मिती शक्य
By admin | Updated: January 17, 2016 01:24 IST