शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

येवलीत हागणदारीमुक्ती करणे हेच मोठे आव्हान

By admin | Updated: November 20, 2014 22:52 IST

चामोर्शी मार्गावर गडचिरोली तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर दिमाखाने उभे असलेले येवली व लगत असलेले गोविंदपूर गाव सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

मिलींद मेडपिलवार - येवलीगडचिरोली- चामोर्शी मार्गावर गडचिरोली तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर दिमाखाने उभे असलेले येवली व लगत असलेले गोविंदपूर गाव सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून देशात खासदार दत्तक ग्राम योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी येवली, गोविंदपूर दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या गावाची परिस्थिती सध्या कशी आहे, गावाची वाटचाल काय आहे, यासंदर्भात लोकमतने घेतलेला हा आढावा.या गावाच्या विकासाचा विडा खासदार अशोक नेते यांनी उचलला असला तरी, सर्वात मुख्य आव्हान आहेत ते हे गाव हागणदारीमुक्त करण्याचे. त्यानंतरच या गावाला शुद्ध मुबलक पाणी, गावातील नाल्यांवर स्लॅब टाकून भूमिगत गटार व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बराच वाव आहे.या गावाने यापूर्वीही हागणदारीमुक्तीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी धर्मरावबाबा आत्राम हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र गावात हागणदारीमुक्ती झाली नाही. गावात ७५ वर्ष जुने हनुमान मंदिर आहे. धार्मिक परंपरा जोपासणारे हे गाव असून गावात अनेकांकडे अद्यापही शौचालय नाहीत. गावाचे दोनही रस्ते शौचासाठी मोकळे असल्याने तेथेच सारे विधी उरकले जात होते. मात्र खासदार अशोक नेते यांनी काही दिवसांपूर्वी स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर आता रस्त्याच्या दोनही बाजु आता स्वच्छ झाले आहे. शिवाय कुणीही घाण करतांना सध्यातरी दिसत नाही. दिसल्यास १०० रूपये दंड आकारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामपंचायतीने अनेकदा प्रयत्न करूनही यापूर्वी गाव हागणदारीमुक्त होऊ शकले नाही. गावाच्या सीमेवर शौचालयास बसल्यास दंड आकारण्यात येईल, हा फलक दिमाखाने उभा आहे. मात्र शौचालयास बसणाऱ्यांना अद्याप शौचालय बांधावे अशी इच्छा झाली नसल्याने ६० टक्के लोक शौचालय नसलेले आहेत. या गावात माजी खासदार मारोतराव कोवासे व विधान परिषदेचे तत्कालीन सदस्य नितीन गडकरी यांच्या निधीतून काही रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यात आले, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली.