शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजना ठरली शोेभेची

By admin | Updated: September 28, 2015 01:44 IST

तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे शासनाने लाखो रूपये खर्चून उपसा सिंचन योजना बांधली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही.

वेलतूर (तुकूम) येथील उपसा योजना : पाच वर्षांपासून सिंचाई विभागाचे होत आहे दुर्लक्षचामोर्शी : तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे शासनाने लाखो रूपये खर्चून उपसा सिंचन योजना बांधली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या योजनेवर झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला असून सदर योजना केवळ शोभेची वस्तू बनली असल्याची टीका वेलतूर (तुकूम) चे सरपंच दिगंबर धानोकर यांनी केली आहे. वेलतूर तुकूम परिसरात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र जलसिंचनाच्या सुविधेअभावी धानाचे पीक एका पाण्याने करपत होते. गावालगत तलाव असला तरी या तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने शेवटपर्यंत पाणी पुरत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उपसा सिंचन योजना बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाने या ठिकाणी उपसा सिंचन योजना मंजूर केली. गावाजवळच बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. या नदीचे पाणी तलावामध्ये टाकणे व तलावाचे पाणी नहराच्या माध्यमातून जवळपासच्या शेतीला पोहोचविणे अशी ही योजना होती. या योजनेमुळे परिसरातील अडीचशे ते तिनशे एकर जमिनीला लाभ होणार होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर वैनगंगा नदीवर उपसा सिंचन योजना तयार केली गेली. नदीच्या पात्रात पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचबरोबर काठावर स्वीचरूम बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही. या योजनेवर आजपर्यंत लाखो रूपये खर्च करण्यात आले. तरीही या उपसा सिंचन योजनेमुळे धानाची एक बांधीसुध्दा ओलिताखाली आली नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाणी योजना सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, पाणी वाटप संस्था तयार करा त्यानंतरच योजना सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र अशा प्रकारची संस्था निर्माण न करताच उपसा सिंचन योजना मंजूर कशी केली व कामे कशी पूर्ण केली, असा प्रश्न सरपंच दिगंबर धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. यावर्षी या गावातील तलाव अर्धवटच भरला आहे. त्यामुळे एका पाण्याने धानपीक करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी धान पिकाच्या रोवणीला उशिर झाला आहे. उपसा सिंचन योजना सुरू झाली असती तर रोवण्याची कामे अगदी वेळेवर होऊन शेतकऱ्यांना थोडेफार अधिकचे उत्पन्न झाले असते. सदर योजनेकडे आमदारांनी लक्ष घालून योजना सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)