शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या दुरूस्तीत सिंचन विभागाने मारली मेख

By admin | Updated: April 18, 2017 00:57 IST

कमलापूर येथील तलावाची दुरूस्ती करणे आवश्यक असतानाही चामोर्शी येथील पाटबंधारे उपविभागाने कार्यकारी अभियंता चंद्रपूर यांना पाठविलेल्या अहवालात ....

कमलापूरचे ग्रामस्थ संतप्त : दुरूस्तीची गरज नसल्याचा अहवाल पाठविलाकमलापूर : कमलापूर येथील तलावाची दुरूस्ती करणे आवश्यक असतानाही चामोर्शी येथील पाटबंधारे उपविभागाने कार्यकारी अभियंता चंद्रपूर यांना पाठविलेल्या अहवालात कमलापूर तलावाची दुरूस्ती करण्याची अजिबात आवश्यकता नसल्याची मेख मारून ठेवली आहे. अशा प्रकारच्या अभिप्रायामुळे तलाव दुरूस्तीत अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे चामोर्शी पाटबंधारे उपविभागाविषयी कमलापूर येथील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.कमलापूर नवीन तलावातील मागील अनेक वर्षांपासून गाळ उपसण्यात आला नाही. त्यामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. याचा सिंचनावर परिणाम पडत चालला आहे. तलावाचे खोलीकरण करून कॅनलची दुरूस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी राज्याचे वित्तमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. वरिष्ठस्तरावरून चामोर्शी पाटबंधारे उपविभाग कार्यालयाला विचारणा झाली असता, या तलावाच्या प्रत्यक्ष सिंचन क्षमतेच्या तुलनेत मागील पाच वर्षात अधिकचे सिंचन झाले आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता केवळ ३३४ हेक्टर आहे. असे असतानाही २०११-१२ मध्ये ४३६ हेक्टर, २०१२-१३ मध्ये ४४० हेक्टर, २०१३-१४ मध्ये ४९२ हेक्टर, २०१४-१५ मध्ये ४३८ हेक्टर, २०१५-१६ मध्ये ४१९ व २०१६-१७ मध्ये ४१५ हेक्टर शेतीला सिंचन झाले असल्याचे म्हटले आहे. शेरामध्ये मात्र सिंचन क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली नसल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ सिंचन विभागाचे अधिकारी कार्यालयातच राहून आकडे भरत असल्याचे स्पष्ट होत आहे. तलावाच्या खोलीकरणाची व कालव्या दुरूस्तीची आवश्यकता नाही. कमलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व लाभार्थी शेतकरी यांच्या निवेदनानुसार कमलापूर लघू तलावाचे बुडीत क्षेत्रातील खोलीकरणाचे काम २०१७-१८ मध्ये करण्यात येईल. २०१७-१८ चा वर्कप्लॅनमधील दुरूस्ती करून नवीन अंदाजपत्रक बनविण्याचे काम उपविभागीयस्तरावर सुरू असल्याचे पाटबंधारे उपविभाग (सिंचन) चामोर्शीचे सहायक अभियंता श्रेणी १ यांनी कार्यकारी अभियंता चंद्रपूर यांना पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. (वार्ताहर)