शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वैफल्यग्रस्त बेरोजगार युवकांसाठी जिल्ह्यात लोहप्रकल्प आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 23:23 IST

रोजगार नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना सुरजागड लोहप्रकल्पामुळे रोजगाराची संधी चालून आली आहे. लॉयड्स मेटल्सने कोनसरी येथील लोहप्रकल्प लवकरात लवकर उभारावा आणि त्यात स्थानिक लोकांनाच रोजगाराची संधी द्यावी, अशी अपेक्षा धर्मरावबाबांनी व्यक्त केली. त्यासाठी कंपनीने स्थानिक युवकांना काैशल्य विकासाचे धडे द्यावे आणि याेग्यतेप्रमाणे सर्वांना काम द्यावे, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्पाला होत असलेला विरोध राजकीय हेतूने आणि दबावामुळे आहे; पण काही लोकांसाठी सर्व बेरोजगारांना वेठीस धरणे योग्य नाही. आधीच जिल्ह्यात कोणताही उद्योग नाही. आष्टीची पेपर मिलही बंद झाल्यात जमा आहे. अशा स्थितीत हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देणारा लोहप्रकल्प जिल्हावासीयांच्या हिताचाच आहे, अशी भूमिका माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी स्पष्ट केली. येथील प्रेस क्लब भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. तेंदुपत्ता हंगाम हा काही दिवसांपुरता मर्यादित असतो. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. रोजगार नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना सुरजागड लोहप्रकल्पामुळे रोजगाराची संधी चालून आली आहे. लॉयड्स मेटल्सने कोनसरी येथील लोहप्रकल्प लवकरात लवकर उभारावा आणि त्यात स्थानिक लोकांनाच रोजगाराची संधी द्यावी, अशी अपेक्षा धर्मरावबाबांनी व्यक्त केली. त्यासाठी कंपनीने स्थानिक युवकांना काैशल्य विकासाचे धडे द्यावे आणि याेग्यतेप्रमाणे सर्वांना काम द्यावे, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली. पत्रपरिषदेला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर, श्रीनिवास गोडशेलवार, लीलाधर भरडकर, सुरेंद्र अलोने आदी राकाँचे पदाधिकारी उपस्थित होते. 

ओरिसातील आदिवासींचा आर्थिक उदय, मग माझ्या जिल्ह्यात का नाही?यावेळी धर्मरावबाबा म्हणाले, ज्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीला लॉयड्स मेटल्सने हा कंत्राट दिला. त्या कंपनीकडे ओरिसात सुरजागडसारख्या ११ खाणींचे काम आहे. त्या सर्व खाणी आदिवासी भागात आहेत. आज तेथील सर्व आदिवासींच्या झोपड्यांचे रूपांतर स्लॅबच्या घरात झाले. त्यांच्याकडे गाड्या-घोड्या येऊन आर्थिक उदय झाला. मग माझ्या जिल्ह्यातील आदिवासींनी तसेच राहायचे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आदिवासींचे दैवत नष्ट होणार, हा अपप्रचारलोहखाणीमुळे सुरजागड पहाडावरील आदिवासींचे दैवत, परंपरा, संस्कृती नष्ट होईल, असा अपप्रचार काही लोकांनी सुरू केला; पण तसे काहीही होणार नाही. लोहखाणीसाठी दिलेली जागा पूजास्थळापासून बरीच दूर आहे. मीसुद्धा आदिवासी असून माझ्यासाठीही ते श्रद्धास्थान आहे. माझे श्रद्धास्थान उद्ध्वस्त होणार असते तर मी स्वस्थ बसलो नसतो, असेही धर्मरावबाबांनी यावेळी स्पष्ट केले. युवकांच्या हाताला काम मिळाल्यास आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या भक्कम होऊन संस्कृती, परंपरा टिकविण्यास अजून वाव मिळेल, असे ते म्हणाले.

राज्य सरकारला   मिळणार मोठा महसूलसुरजागड लोहखाणीतून जवळपास ३० लाख मे.टन लोहदगड काढले जाईल. त्यापैकी ५ लाख मे.टन घुग्गुसच्या कारखान्यात जाईल, तर उर्वरित २५ लाख मे.टन कोनसरीसह इतर ठिकाणच्या लोहप्रकल्पांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी जाईल. यातून राज्य सरकारला वार्षिक ५१६ कोटी रुपयांचा महसूल आणि १६० कोटींची रॉयल्टी मिळेल. याशिवाय कंपनीच्या सीएसआर फंडातून एटापल्ली, अहेरी तालुक्यात मोठी विकासात्मक कामे होतील, असा विश्वास धर्मरावबाबांनी व्यक्त केला.