शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

महिलेच्या तक्रारीत राकाँ नेत्याचा सहभाग

By admin | Updated: July 17, 2014 00:06 IST

आसरअली पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी निर्मला व्यंकटी मोगरम या महिलेला मारहाण केलेली नाही. या महिलेच्या तक्रारीमागे सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक

आसरअली : आसरअली पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी निर्मला व्यंकटी मोगरम या महिलेला मारहाण केलेली नाही. या महिलेच्या तक्रारीमागे सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता असल्याचा आरोप आसरअली भागातील नागरिकांनी केला आहे.आसरअली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंगधाम पेठा येथे एक मुलगी ३० मे रोजी घरून कुणालाही न सांगता निघून गेली. सदर मुलीच्या वडीलांनी आसरअली पोलीस ठाण्यात १ जून रोजी तक्रार दाखल केली. मुलीचा शोध घेतला असता, महेंद्र व्यंकटी मोगरम याने मुलीला पळवून नेल्याचा संशय रंगधाम पेठा येथील गावकऱ्यांनी व्यक्त केला. ३० जूनला महेंद्र मोगरम हाही गावातून बेपत्ता झाला होता. त्यामुळे मुलीचा व महेंद्रचा शोध घेण्यासाठी निर्मला मोगरम यांना पोलिसांनी तपासाकरिता बोलविले. महेंद्र मोगरम याने २०१० मध्येही एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.गावकरी या घटनेमुळे संतप्त होते. त्यांनी निर्मला मोगरम यांनाही मारहाण केली असती, त्यामुळे त्यांना सुरक्षेसाठी ठाण्यात बोलाविण्यात आले व दिवसभर ठेवण्यात आले, अशी माहिती आसरअली पोलिसांनी लोकमतला दिली आहे. दरम्यान ५ जुलै रोजी नलीकुडा येथे जनजागरण मेळाव्यात पोलीस व्यस्त असतांना सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी पत्रकारांच्या समक्ष पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्या बेकायदेशिर धंद्यांबाबत वरिष्ठांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली होती. या महिलेच्या तक्रारीमागेही तेच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.