शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

वन तस्कराच्या मृत्यूची चौकशी

By admin | Updated: May 31, 2014 23:30 IST

वन कर्मचारी व सागवान तस्कर यांच्या झालेल्या चकमकीत अनमुला आईलन्ना नर्सय्या रा. गंजीरामपेठा हा मृत्यू पावला. याबाबतची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येत आहे.

सिरोंचा : वन कर्मचारी व सागवान तस्कर यांच्या झालेल्या चकमकीत अनमुला आईलन्ना नर्सय्या रा. गंजीरामपेठा हा मृत्यू पावला. याबाबतची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येत आहे. सिरोंचा वन विभागाच्या झिंगानूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. २१0 मध्ये २0 फेब्रुवारी २0१३ रोजी वन कर्मचारी व वन तस्कर यांच्यात झालेल्या चकमकीत अनमुला आईलन्ना नर्सय्या (३0) हा वन तस्कर मृत्यू पावला. सदर हल्ल्यात उपविभागीय वनाधिकारी देवीदास जिद्देवार यांच्यासह बामणीचे वनपरिक्षेत्राधिकारी बालय्या सिरबोईना गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ज्यांना निवेदन अथवा प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहेत त्यांनी १0 जूनपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी अहेरी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून माहिती सादर करावी. माहिती पुरविणार्‍याच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. यापूर्वीही सन २00९ मध्ये सोमनूरजवळील इंद्रावती नदीच्या पात्रात असरअल्लीचे क्षेत्र सहायक दिगांबर बलकी यांनी केलेल्या गोळीबारात सोमनपल्ली येथील तीन वन तस्कर ठार झाले होते. यातील कल्लेम रमेश, जावा सिताराम यांचे मृतदेह आढळून आले. मात्र तिसर्‍याचा मृतदेह सापडला नाही. या प्रकरणाबाबत बरेच चर्वितचर्वण झाल्यावर तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी दामोधर नान्हे यांच्या न्यायालयात चौकशी सुरू झाली. मात्र सदर प्रकरण अजूनही गुलदस्त्यातच आहे. १४ मार्च रोजी वन कर्मचारी व वन तस्करांच्या कथित चकमकीत भोगापूर येथील गोरय्या कोमाटी या ४४ वर्षीय तस्कराचा मृत्यू झाला. अलीकडेच घडलेले हे प्रकरणही गुलदस्त्यात आहे.