शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गर्भपाताचे प्रमाण वाढले

By admin | Updated: March 16, 2017 01:13 IST

दर हजारी मुलांमागे ९०० अथवा ९५० मुली जन्माला आल्यास मुला/मुलींचा लिंग गुणोत्तर योग्य राहतो.

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घटला : जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती गडचिरोली : दर हजारी मुलांमागे ९०० अथवा ९५० मुली जन्माला आल्यास मुला/मुलींचा लिंग गुणोत्तर योग्य राहतो. शासनाचेही असेच धोरण आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या गर्भपाताचे प्रमाण वाढले असून मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे आता कठोर पाऊले उचलण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, डॉ. अरूण शेंद्रे उपस्थित होते. कोरची, भामरागड, धानोरा, सिरोंचा या तालुक्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. इतर आठ तालुक्यात मुलींचा दर मुलांच्या तुलनेत ९५० च्या वर आहे. कोरची तालुक्यात दर हजारी मुलांमागे ७०५, भामरागड ७६४, धानोरा ७२४ व सिरोंचा ८९७ असा मुलींचा जन्मदर आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भंडारी यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार मुले जन्म घेत आहेत. मात्र वर्षाला १ हजार पेक्षा कमी मुली जन्म घेत आहेत. त्यामुळे मुलींचे लिंग गुणोत्तर कमी आहे, असेही ते म्हणाले. लिंग परीक्षण व अवैधरित्या गर्भपातास आळा घालणे गरजेचे असून तसे प्रयत्न आरोग्य विभागातर्फे होतील, असे डॉ. खंडाते यांनी सांगितले. शासकीय व खासगी रुग्णालयांची तपासणी होणार पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी याच कायद्याअंतर्गत १५ मार्च ते १५ एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत जिल्हास्तरीय समितीमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाची कडक तपासणी होणार आहे. शिवाय सोनोग्राफी सेंटर, प्रसूती विभाग व पॅथालॉजीची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांनी दिली. रुग्णालयात पॅनलवर कोणते डॉक्टर आहेत, उपलब्ध औषधी साठा, सोयीसुविधा, अवैध गर्भपात होते काय, लिंग परीक्षण, तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी आहेत काय आदींबाबतची सखोल तपासणी समितीमार्फत करण्यात येणार आहे.