शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धानपीक रोवणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:42 IST

सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपºहे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला.

ठळक मुद्देवैरागड परिसरात मजुरांना रोजगार : समाधानकारक पावसाने शेतकरी आनंदी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपऱ्हे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला.पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना उलटला तरी मान्सून सक्रीय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ८ जून रोजी झालेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगरणी व वखरणीची कामे पूर्ण केली. तसेच बाह्य मशागतीचे काम आटोपून आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम पूर्ण केले. मात्र त्यानंतर पावसाचा पत्ता नसल्याने धान पऱ्हे करपण्याच्या मार्गावर होते. असे असताना २७ जून रोजी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. समाधानकारक पावसाने शेतकरी सध्यातरी आनंदीत असून खरीप हंगामाच्या तयारीला जोमाने भिडले आहे. वैरागड परिसरात शासनाच्या धडक सिंचन व नरेगा योजनेतून सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच अनेक शेतकºयांनी कृषिपंपाची जोडणी केली. त्यामुळे सिंचनाची सुविधा या भागात झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर वैरागड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच धानपऱ्हे टाकले. हे पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने काही शेतकऱ्यांनी रोवणीचे काम हाती घेतले आहे. या कामातून अनेक महिला व पुरूष मजुरांना रोजगार मिळत आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतशिवारात पाणी साचले आहे. पऱ्हेही रोवणीयोग्य झाल्याने येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा पाऊस बरसल्यास बहुतांश गावातील रोवणीचे काम सुरू होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस