शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अन्न प्रशासन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ; मोहीम राबविण्यास येताहेत अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:46 IST

Gadchiroli : तंबाखू, खर्रा सांगा कोण तपासणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रतिबंधित पदार्थाच्या कारवाया केल्यानंतर पोलिसांनी तापसणीसाठी पाठवलेले कोणतेही नमुने यापुढे अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तपासले जाणार नाहीत. राज्याच्या सह आयुक्तांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. परंतु पोलिसांनी सहकार्य मागितल्यास अशा प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र सहकार्य केले जाते. जिल्ह्यात गुटखा, सुगंधित तंबाखू जप्तीच्या अनेक कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, तसेच गुटख्याची सीमावर्ती भागातून चोरट्या मार्गाने तस्करी होते. मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास ही तस्करी होत असल्याने कारवाई होत नाही. परिणामी अनेकांचे फावते. याशिवाय जिल्ह्यातील काही गावे सुगंधित तंबाखू पुरवठ्याचे केंद्र बनलेली आहेत. येथून तंबाखूचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांना होतो. विशेष म्हणजे, अन्न विभागाकडे अल्प मनुष्यबळ आहे. त्यामुळे कारवाया करताना अडचणी येतात. सदर अडचणी दूर करण्यासाठी या विभागातील रिक्त पदे लवकर भरण्याची गरज आहे. तेव्हाच तपासणी मोहीम तीव्र होईल. ५९ लाख रुपयांचा मुद्देमाल मागील वर्षी अन्न विभागाने जप्त केलेला आहे. नवीन वर्षातही जप्तीची कारवाई सुरूच आहे.

वर्षभरात कारवाया किती?जिल्ह्यात मागील वर्षी २५ प्रकरणांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केलेली आहे. संबंधितांकडून मुद्देमाल जप्त केलेला आहे.जिल्ह्याला तेलंगणा, छत्तीसगड राज्यांची सीमा लागलेली आहे. याशिवाय चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. त्यामुळे सहजपणे येथे तंबाखू व गुटख्याची तस्करी होते. त्यामुळे अन्न प्रशासनाने येथेसुद्धा कारवाई करणे गरजेचे आहे.

येथे कारवाई अपेक्षितदेसाईगंज, आरमोरी, वैरागड, पोर्ला, देऊळगाव तसेच अहेरी उपविभागातील सर्वच तालुक्यांमध्ये तंबाखू विक्री होते

'ते' नमुने तपासणार नाहीतअन्नसुरक्षा कायदा व पोलिसांचा मुद्देमाल जप्तीचा कायदा वेगवेगळा असल्याने पोलिसांनी जप्त केलेल्या नमुन्यांची तपासणी करताना अडचणी येतात. त्यामुळे सदर नमुने तपासणी न करण्याचे निर्देश आहेत.

येथे कारवाई अपेक्षितदेसाईगंज, आरमोरी, वैरागड, पोर्ला, देऊळगाव तसेच अहेरी उपविभागातील सर्वच तालुक्यांमध्ये तंबाखू विक्री होते.

"अन्नसुरक्षा कायदा व पोलिस कायदा वेगवेगळा असल्याने नमुने तपासणी प्रक्रिया व कारवाई करताना अडचणी येतात. तरीसुद्धा अनेकदा अन्न विभाग कारवाईसाठी पोलिसांना सहकार्य करतो."- सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग