शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑसंतांच्या सहवासाने जगण्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भरदार देहयष्टी, अंगात खादीचा कुर्ता, डोक्यात टोपरा, खड्या आवाजातील राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची भजने आणि त्यांचे मानवतावादी विचार प्रत्येक व्यक्तीला जगण्याची नवी उमेद निर्माण करून देतात, असे विचार राष्टÑसंतांचा सहवास लाभलेले रामचंद्र तावेडे यांनी लोकमत प्रतिनिधीसमोर व्यक्त केले.राष्टÑसंत तुकडोजी महाराज हे वैरागड, कोसबी, सोनसरी, विसोरा, देसाईगंज, आमगाव, ...

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भरदार देहयष्टी, अंगात खादीचा कुर्ता, डोक्यात टोपरा, खड्या आवाजातील राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची भजने आणि त्यांचे मानवतावादी विचार प्रत्येक व्यक्तीला जगण्याची नवी उमेद निर्माण करून देतात, असे विचार राष्टÑसंतांचा सहवास लाभलेले रामचंद्र तावेडे यांनी लोकमत प्रतिनिधीसमोर व्यक्त केले.राष्टÑसंत तुकडोजी महाराज हे वैरागड, कोसबी, सोनसरी, विसोरा, देसाईगंज, आमगाव, आरमोरी येथे जनजागृतीच्या कार्यक्रमांसाठी येत होते. यावेळी त्यांची राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची ओळख झाली होती. पुढे माहिती देताना तावेडे म्हणाले, राष्टÑसंतांसोबत छायाचित्र काढले. सदर छायाचित्र अजूनही राष्टÑसंतांच्या स्मृती जागृत करते. तत्कालीन समाजात असलेला अज्ञान, अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी, पंरपरा यावर भजनांच्या माध्यमातून प्रहार करीत होते. त्यांच्या भजनांना अफाट गर्दी उसळत होती. ही गर्दी शेवटपर्यंत कायम राहत होती. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य राष्टÑसंतांच्या भजनामध्ये होते.कुरखेडा तालुक्यात कार्यक्रमासाठी आल्यानंतर आंधळी येथील खुणे पाटील यांच्याकडे मुक्कामाला राहत होते. गुरूदेव भक्त एकनाथ कुंभारे यांच्याकडे सुद्धा राष्टÑसंतांनी मुक्काम केला होता. तुकडोजी महाराज वैरागड येथे हत्तीवर बसून आले. त्यांनी भंडारेश्वर मंदिराला भेट दिली. वैरागडजवळील कोसबी गावालाही गेले, अशी माहिती दिली.