शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

केंद्रीय सहसचिवांकडून कामाची पाहणी

By admin | Updated: June 10, 2015 01:56 IST

आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ठाणेगाव ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या रोजगार हमीच्या कामांना केंद्रीय सहसचिव सुब्रह्मण्यम यांनी मंगळवारी भेट देऊन कामाची पाहणी केली.

ठाणेगाव : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ठाणेगाव ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या रोजगार हमीच्या कामांना केंद्रीय सहसचिव सुब्रह्मण्यम यांनी मंगळवारी भेट देऊन कामाची पाहणी केली. ठाणेगाव ग्रामपंचायत अंतर्गत मामा तलावाचे खोलीकरण, सिंचन विहीर, पांदन रस्त्याचे काम केले जात आहे. या कामावर गावातील शेकडो मजूर काम करीत आहेत. या कामांना केंद्रीय सहसचिव सुब्रह्मण्यम यांनी अचानक भेट दिली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. सहसचिवांनी प्रत्यक्ष कामाला भेट देऊन कामाचा दर्जा तपासला. यावेळी कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधून मजुरी वेळेवर मिळते की, नाही, मागणी केल्यानंतर तत्काळ रोजगार उपलब्ध होतो काय? किमान १०० दिवसांचा रोजगार मिळायला काय? आदी प्रश्न विचारले. रोजगार हमी योजनेच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेचे काम नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, रोहयो उपजिल्हाधिकारी पिंपळगावकर, उपविभागीय अधिकारी नान्हे, तहसीलदार वलथरे, संवर्ग विकास अधिकारी निमजे, उपविभागीय अभियंता गजगाटे शाखा अभियंता बन्सोड, पंचायत विस्तार अधिकारी देवारे, सरपंच गो. सा. मडावी, उपसरपंच लालाजी कुकुडकर, गोपाल भांडेकर, ग्रामविकास अधिकारी एल. टी. भांडेकर, ग्रा.पं. सदस्य गिरीधर कुनघाडकर, निकेश मडावी, तलाठी कुमरे, बालाजी मडावी, सूर्यकांता गजभिये, अनिता लक्षणे, सीमा उपरीकर, चंद्रशेखर किरमे, रोजगार सेवक रामेश्वर चिचघरे उपस्थित होते.