शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमित्रांद्वारे तपासणी

By admin | Updated: November 20, 2014 22:50 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टर नसल्याने आरोग्यमित्रांकडून रूग्णांची तपासणी केली जात आहे.

जिल्हा रूग्णालय : राजीव गांधी जीवनदायी योजनागडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टर नसल्याने आरोग्यमित्रांकडून रूग्णांची तपासणी केली जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वतंत्र डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य मित्र नेमण्यात आले आहेत. हे आरोग्य मित्र राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत औषधोपचार करण्यासाठी रूग्णाला गडचिरोली येथे पाठवितात. राजीव गांधी योजनेसोबत जोडल्या गेलेल्या रूग्णालयाने रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टरची नियुक्ती करावी, असे बंधन घालण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात मात्र स्वतंत्र डॉक्टर नेमण्यात आले नसून याचा प्रभार दुसऱ्या एका डॉक्टरवर सोपविण्यात आला आहे. सदर डॉक्टर जिल्हा सामान्य रूग्णालयाचे काम सांभाळून राजीव गांधी योजनेच्याही रूग्णांची तपासणी करतात. मात्र सदर डॉक्टर बऱ्याचवेळा उपस्थित राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रूग्णाला ताटकळत बसावे लागते. शेकडो किमी अंतरावरून आलेल्या रूग्णांचा यामुळे भ्रमनिरास होतो. त्रस्त झालेल्या रूग्णांची केवीलवानी परिस्थिती बघून राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत नेमण्यात आलेले आरोग्य मित्र बऱ्याचवेळा रूग्णांची तपासणी करीत असल्याचे दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे, आरोग्यमित्रांना वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेच ज्ञान नाही. त्यामुळे एखादेवेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वतंत्र डॉक्टर नसल्याने रूग्णांच्या आॅपरेशनची परवानगी मागण्यासही उशीर होत असल्याने राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या रूग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (नगर प्रतिनिधी)