शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दस्तावेजांच्या तपासणीने शिक्षकांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 22:09 IST

संवर्ग १ व २ मध्ये मोडणाºया शिक्षकांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देसंवर्ग १ व २ च्या बदल्या : काही जिल्ह्यांमध्ये तपासणीचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संवर्ग १ व २ मध्ये मोडणाºया शिक्षकांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.बदली प्रक्रिया राबविण्यासाठी ग्राम विकास विभागाने शिक्षकांकडून आॅनलाईन अर्ज भरून मागितले होते. अर्ज भरतेवेळी शिक्षकाला केवळ माहिती भरायची होती. मात्र त्या अर्जासोबत कागदपत्रे अपलोड करायची नव्हती. याचा गैरफायदा काही शिक्षकांनी घेतला. संवर्ग १ मध्ये अपंग, विधवा, कुमारिका, अपंग पाल्यांचे वडील यांचा समावेश होतो. तर संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा समावेश होतो. या दोन्ही संवर्गाची प्रक्रिया पार पडली असून बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेकांनी चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ उचलला असल्याची प्रकरणे काही जिल्ह्यांमध्ये लक्षात आली आहेत. त्यामुळे जे शिक्षक ज्या कारणास्तव बदलीपात्र ठरले आहेत. त्यांच्या प्रमाणपात्रांची तपासणी करावी, असे निर्देश ग्राम विकास विभागाने संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाºयांना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकाºयांनी गट शिक्षणाधिकाºयांना पत्र दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत अजूनपर्यंत पत्र निघाले नसले तरी काही दिवसातच असे पत्र काढले जाईल, हे निश्चित आहे.गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे बदलीचा लाभ उचलण्यासाठी जिल्ह्यातीलही शिक्षकांनी चुकीची माहिती अर्जात सादर केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बदलीपात्र ठरलेल्या शिक्षकांची चौकशी करावी, अशी मागणी आहे.महिला पोलीस पाटलाचा शिक्षक पती ठरला पात्रपती-पत्नी एकत्रीकरणासाठी संबंधित शिक्षकाची पत्नी सरकारी नोकरीतच असणे आवश्यक आहे. मात्र पोलीस पाटील, अंगणवाडी मदतनिस, अंगणवाडी सेविका, वॉचमन आदी मानधन तत्वावर नोकरी करीत असलेल्या पत्नींच्या शिक्षक पतीराजांनी संवर्ग २ साठी अर्ज केला असल्याचे उघड झाले आहे. मानधन तत्वावर काम करीत असलेल्या पत्नीसाठी पती-पत्नी एकत्रीकरणाचा मुद्दा लागू होत नाही. ही बाब शिक्षकांना चांगल्या पध्दतीने माहित असतानाही त्यांनी जाणूनबुजून दिशाभूल करणारी माहिती भरली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. संबंधित शिक्षकांनी विवाहाचा पुरावा टाकला नाही. काहिंनी नमणूक आदेश टाकले नाही. कार्यरत ठिकाण व मुख्यालयापासूनचे अंतरही टाकले नाही. तरीही संबंधित शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.बदली प्रक्रियेत आणखी एक विघ्नबदली प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न ग्राम विकास विभागाकडून चालविला जात आहे. मात्र प्रत्येक टप्प्यावर अडचणी येत आहेत. संवर्ग १ व २ मध्ये मोडणाºया बदलीपात्र शिक्षकांची यादी अंतिम समजली जात होती. मात्र यादी झळकताच संबंधित शिक्षकांसदर्भात आक्षेप सुरू झाले आहे. आता दस्तावेजांची तपासणी केली जाणार असल्याने बदलीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडणार आहे.काही जिल्ह्यांमध्ये संवर्ग १ व २ च्या बदलीपात्र शिक्षकांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे निर्देश संबंधित शिक्षणाधिकाºयांनी दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात संवर्ग १ व २ च्या बदल्यांची प्रक्रिया दुसºया टप्प्यात उशीराने राबविली जाणार आहे. दस्तावेजांची तपासणी करण्याबाबत अजूनपर्यंत आपल्याला पत्र प्राप्त झाले नाही. पत्र मिळाल्यानंतर तशा प्रकारचे पत्र काढले जाईल.- जयंत बाबरे, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी