लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न केला जाईल. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याकरिता प्रयत्न करणार, असे आश्वासन आ. कृष्णा गजबे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले.कुरखेडा पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी आ. कृष्णा गजबे यांनी धान व अन्य पिकाच्या नुकसानीबाबत चर्चा केली. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचनाही याप्रसंगी दिल्या. तसेच शेतकरी व कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी मालदुगीचे शेतकरी यशवंत चौरीकर यांनी शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली. आमदार कृष्णा गजबे, यांनी नायब तहसीलदार मडावी, तालुका कृषी अधिकारी रामटेके, संवर्ग विकास अधिकारी मुदगुल यांच्याशी सकारात्मक चर्चा करून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, बबलू हुसैनी, जि.प. सदस्य भाग्यवान टेकाम, गीता कुंभरे, खेमनाथ डोंगरवार, व्यंकटी नांगीलवार, विनोद खुणे, हेमंत शेंदरे, उद्धव गहाणे व शेतकरी उपस्थित होते.अनेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्राची प्रतीक्षादिवाळी सणानंतर अनेक शेतकऱ्यांचे हलके धान पीक निघाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी मळणीसुद्धा केली होती. परंतु त्यानंतर परतीचा पाऊस सुरू झाला. पाऊस अधून-मधुन येत आहे. तरीसुद्धा सुरूवातीला मळणी केलेल्या शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे तर काही शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करून मोकळे झाले. त्यामुळे महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.
नुकसानग्रस्त पिकाची आमदारांकडून पाहणी; शेतकऱ्यांना दिले आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST
कुरखेडा पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी आ. कृष्णा गजबे यांनी धान व अन्य पिकाच्या नुकसानीबाबत चर्चा केली. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचनाही याप्रसंगी दिल्या. तसेच शेतकरी व कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
नुकसानग्रस्त पिकाची आमदारांकडून पाहणी; शेतकऱ्यांना दिले आश्वासन
ठळक मुद्देकुरखेडात अधिकाऱ्यांची बैठक । सर्वेक्षण करून पंचनामे सादर करण्याचे निर्देश