अहेरी : निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करणे, अत्यंदोय योजनेतून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करणे आदींसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहेरी काँग्रेसच्या वतीने शनिवारी स्थानिक राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात वन अकादमी स्थापन करणे, वनांवर आधारित उद्योग, बांबू तोडायला तत्काळ मंजुरी देणे, तीन पिढ्यांची अट रद्द करून गैरआदिवासींना जबरान ज्योतचे पट्टे देणे, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना एक हजार ५०० रूपये आर्थिक लाभ देण्यात यावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अहेरी जिल्हा निर्माण करावा, चव्हेला धरण बंद करून काम बंद करण्यात यावे, सुरजागड लोह व देवलमरी सिमेंट उद्योग सुरू करण्यात यावा, आलापल्ली, नागेपल्ली येथे नवीन नळ योजना सुरू करावी, एपीएल कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य द्यावे, गाव तेथे तलाव बांधण्यात यावे, होमगार्ड कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेचे काम पुन्हा सोपविण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगारांना महामंडळाकडून थेट कर्ज द्यावे, तालुक्यातील पुलांची उंची वाढवावी आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सिलमवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. महेबुब अली, अर्जुन कांबळे, सलीम शेख, व्यंकटेश चिलनकर, रामप्रसाद मुंजमकार, मधुकर गोंगले, अविनाश गोर्ले, परदेशी, आलाम, गणेश चापडे, गणेश मडावी, शेख जलील, सलीम कुरेशी, सलमान खान, युनुस शेख, दिवाकर दुर्गे, शेख गफ्फार हजर होते.
अहेरीत काँग्रेसचे धरणे
By admin | Updated: March 22, 2015 00:30 IST