दुसऱ्या टप्प्यात निवडणूक : तहसील कार्यालयात कार्यक्रमएटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली तालुक्यात २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मतदान होणार आहे. येथे प्रशासनाने निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत गुरूवारी एटापल्ली तहसील कार्यालयात निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना इव्हीएम मशीनबाबतची माहिती देण्यात आली.यावेळी उपविभागीय अधिकारी विपीन इटनकर यांच्यासह एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम पार पाडले. एटापल्ली तालुक्यात चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणासाठी ७१ मतदार केंद्र राहणार आहेत. १९ हजार ११५ स्त्री, २० हजार ४३६ पुरूष असे एकूण ३९ हजार ५५१ मतदार आहेत. १ संवेदनशील, ७० अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. येथे निवडणूक काम पार पाडण्यासाठी एटापल्ली तालुक्यात २८४ मतदान पथकातील कर्मचारी, १४ क्षेत्रीय अधिकारी लागणार आहेत. या कर्मचाऱ्यांना इव्हीएम विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. दुर्गम भागात मतदान वाढावे यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठीही विविध पथक तालुका प्रशासनाने तैनात केले आहे. एकूणच २१ फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय सर्व सोपस्कर पार पाडले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्लीत इव्हीएम मशीनची कर्मचाऱ्यांना दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 01:23 IST