शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

दुष्काळी योजनांची माहिती द्या

By admin | Updated: October 21, 2015 01:35 IST

राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

देसाईगंज येथे आढावा बैठक : खासदारांचे अधिकाऱ्यांना निर्देशदेसाईगंज : राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळग्रस्त गावांना विविध सोयीसवलती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत व विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले आहे.स्थानिक नगर पालिकेच्या सभागृहात मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आढावा बैठकीला आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष श्याम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार अजय चरडे, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, नगरसेवक राजू जेठाणी, नाना नाकाडे, नगरसेविका शालू दंडवते, सुनीता ठेंगरी आदी मान्यवर उपस्थित होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयणीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीयस्तरावरून विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. केंद्र शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेचा सुद्धा लाभ घेण्याचे आवाहन केले. तालुक्यातील वीज, मामा तलावांचे खोलीकरण, रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, शंकरपूर येथील ३३ केव्हीचे विद्युत केंद्र तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. मुख्यालयी राहण्याचा मुद्याही उपस्थित केला.आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही पाच खातेप्रमुख आढावा बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. आढावा बैठकीदरम्यान विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलीस विभागाने शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच शहरात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटनांवर जातीने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)