शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांचे निकृष्ट बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:01 IST

सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता काँक्रिट टाकले जात आहे. याशिवाय वायब्रेट मशीनचाही वापर केला जात नाही. कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने बंधाऱ्याचे बांधकाम करीत आहेत. येथे अनुभवी गवंडीसुद्धा दिसून येत नाही. बहुतांश ठिकाणी नाल्यामधील रेतीचा वापर बांधकामासाठी केला जात आहे.

ठळक मुद्देघोट परिसर : अहेरी जलसंधारण उपविभागामार्फत सुरू आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : अहेरी जलसंधारण उपविभागांतर्गत हैैद्राबाद येथील खासगी कंपनीच्या वतीने घोट परिसरात सात बंधारे मंजूर आहेत. यापैैकी पाच बंधाऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु बंधारा बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने सदर बंधारे किती वर्ष टिकणार याबाबत नागरिकांमध्ये साशंक भावना आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बांधकामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.घोट परिसरात मार्च २०२० पासून मच्छली, चापलवाडासह परिसरात जवळपास सात बंधारे मंजूर करून बांधकामही सुरू झाले. त्यापैैकी पाच बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यात १२ ते १३ बंधाऱ्याचे काम जलसंधारण विभागाकडून हैैद्राबाद येथील कोरेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला देण्यात आली. परंतु या कामांवर जलसंधारण विभागाच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष दिसून येते. याचा फायदा घेत कंपनीकडून बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम केले जात आहे. माती व गाळ मिश्रीत रेतीचा वापर करून सिमेंट काँक्रिट केले जात आहे. तसेच सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता काँक्रिट टाकले जात आहे. याशिवाय वायब्रेट मशीनचाही वापर केला जात नाही. कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने बंधाऱ्याचे बांधकाम करीत आहेत. येथे अनुभवी गवंडीसुद्धा दिसून येत नाही. बहुतांश ठिकाणी नाल्यामधील रेतीचा वापर बांधकामासाठी केला जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिसून येत असल्याने जोरदार पाऊस येऊन पूर आल्यास बांधकाम ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च महिन्यात सुरू केलेले काम लवकर करणे आवश्यक होते. अथवा वर्षाच्या सुरूवातीलाच सदर काम हाती घेणे गरजेचे होते. परंतु या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात सदर काम रखडल्याने आगामी काळात किती दिवसात काम पूर्ण होईल, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.मच्छली-चापलवाडा नाल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती रिजेक्ट करण्यात आली आहे. बंधारा बांधकामासाठी उत्कृष्ट रेती व साहित्याचा वापर करण्यात येईल. बंधारे बांधकामस्थळी आपण नेहमीच येत असतो. आपल्या देखरेखी खाली बांधकाम सुरू आहे. या बंधारा बांधकामासंदर्भात नागरिकांच्या काही शंका असल्यास त्यांचे समाधान केले जाईल. बंधारा बांधकामस्थळी कनिष्ठ अभियंत्यांना याकरिता पाठविले जाईल.- श्रावण शेंडे, उपअभियंता, जलसंधार उपविभाग, अहेरी

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प