शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे वाढले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:21 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरूवारी (दि.२३) उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांमध्ये उत्साह : निकालाच्या अंदाजाची नव्याने केली जातेय उजळणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरूवारी (दि.२३) उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्यात सरळ लढत झाल्याने दोघांपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये वाढली आहे. दुसरीकडे या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन काहीसे वाढले आहे. रिंगणातील इतर तीन उमेदवार आपल्याला किती मतांचा कौल मिळेल या विचाराने टेन्शनमध्ये आले आहेत.जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गेल्या ११ एप्रिल रोजी मतदान झाले होते. नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे नक्षल दहशत असूनही मतदानाची टक्केवारी विदर्भात सर्वाधिक म्हणजे ७१.९८ वर गेली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षाही यावेळी मतदान जास्त झाल्यामुळे मतदारांच्या मनात नेमके काय याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मतदानात अडथळे आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी दोन दिवसात तीन भूसुरूंग स्फोट घडविण्यासोबतच पोलिसांवर फायरिंगही झाली. परंतू तरीही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागात वाढलेली ही मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता वाढली आहे.या निवडणुकीत भाजप-सेना युतीचे अशोक नेते, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे या पाच उमेदवारांनी आपले नशिब आजमावले. मात्र खरी लढत नेते आणि उसेंडी या दोनच उमेदवारांमध्ये झाल्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आपलाच उमेदवार जिंकणार असा विश्वास त्यांच्यात दिसत आहे.विजयोत्सव साजरा करण्याची तयारीमतदानानंतर निकालासाठी तब्बल सव्वा महिना वाटप पहावी लागली. आता एकदाचा कधी विजयोत्सव साजरा करतो, या आशेने दोन्ही प्रमुख उमेदवारांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. कमी फरकाने का होईना, आपलाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. विजयाचा जल्लोष करण्याची तयारीही त्यांनी केली आहे. परंतू त्यांचा हिरमोड तर होणार नाही ना, याची चिंताही उमेदवारांना व प्रमुख कार्यकर्त्यांना लागली आहे.मतमोजणीसाठी प्रशासन सज्जमतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मतमोजणीचे ठिकाण असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. जवळपास ७०० वर कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी सज्ज झाले आहेत. मतमोजणीच्या २५ फेºया आणि पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास संध्याकाळ होणार आहे. मात्र प्रत्येक फेरीतील मतांच्या आघाडीवरून कोण बाजी मारणार याचा अंदाज आधीच येऊ शकेल.