विद्यार्थी व शिक्षकांना मनस्ताप : पुढील वर्षांपासून होणार अंमलबजावणीशासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात २०११ मध्ये शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये अनेक शाळांनी अनुदान लाटण्यासाठी खोटे विद्यार्थी दाखविल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्याचा शालेय शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. विद्यार्थी सरल फार्मद्वारे देखील बोगस विद्यार्थी समोर येणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने पुढील वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली अंमलात आणण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शासनस्तरावर जोरदार हालचाली सुरू असून नियोजनही होत असल्याची माहिती आहे. पुढील वर्षांपासून शाळांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली अंमलात आल्यास बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटणाऱ्या शाळा व संस्थाचालकांना चाप बसणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीमध्ये पुढील वर्षांपासून पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद करण्याची सोय होणार आहे. त्यानंतर या प्रणालीद्वारे विद्यार्थी उपस्थितीची नोंद घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी, आधार कार्ड क्रमांक याबाबी पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षंपासून शाळांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बायोमेट्रिक हजेरीमुळे डोकेदुखी वाढणार
By admin | Updated: August 19, 2015 01:44 IST