सिराेंचा शहरातील रस्त्याची काही वर्षांपूर्वी निर्मिती व त्यानंतर डांबरीकरण करण्यात आले. परंतु अनेक ठिकाणचा रस्ता उखडला व येथून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. हा मुख्य मार्ग असल्याने नाली बांधकाम करणे व नालीतील गाळ उपसणे आवश्यक आहे. याच मार्गावर प्रमुख कार्यालये व मार्केटही आहे. बसस्थानक चौक ते नेहरू चौकापर्यंत व बसस्थानक चौक ते राजीव चौकापर्यंत व राजीव चौक ते ग्रामीण रुग्णालय चौकापर्यंत नगरपंचायतीकडून रुंदीकरणासह सिमेंट काॅंक्रीट रस्ता बांधकाम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्याच धर्तीवर तहसील कार्यालय ते राजीव चौक व राजीव चौक ते मस्जिद चौकापर्यंत रुंदीकरणासह सिमेंट काॅंक्रीट रस्ता बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
080821\15560539img_20201019_162027_1.jpg
तहसिल कार्यालय ते राजीव चौक ते मस्जिद चौक पर्यंत रुंदी करणासह सिमेंट क्रांकरीट रस्ता बांधकाम करण्याची मागणी!