शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

पोलीस पाटलांचे मानधन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

गाव पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रूपये मानधन दिले जात आहे. सदर मानधन नियमित दिले जात नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना १५ हजार रूपये मानधन द्यावे, पोलीस पाटील सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्ष करावी, तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीनंतर कोणताही आर्थिक आधार नसल्याने सेवानिवृत्ती म्हणून २ लाख रूपये द्यावे किंवा ६ हजार रूपये प्रति माह पेंशन द्यावी.

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्षांना निवेदन : गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गाव पातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस पाटलांना अत्यल्प मानधन दिले जाते. महागाईच्या काळात सदर मानधन परवडणारे नाही. त्यामुळे पोलीस पाटलांचे मानधन वाढवून अन्य मागण्या मार्गी लावाव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, गाव पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रूपये मानधन दिले जात आहे. सदर मानधन नियमित दिले जात नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना १५ हजार रूपये मानधन द्यावे, पोलीस पाटील सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्ष करावी, तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीनंतर कोणताही आर्थिक आधार नसल्याने सेवानिवृत्ती म्हणून २ लाख रूपये द्यावे किंवा ६ हजार रूपये प्रति माह पेंशन द्यावी. पोलीस पाटील भरतीत त्यांच्या वारसानास योग्यतेनुसार प्राधान्य द्यावे, कार्यरत असताना पोलीस पाटलांचे अपघाती किंवा नैसर्गिकरित्या निधन झाल्यास त्यांच्या वारसानाचा शासकीय नोकरीत समावेश करावा, बैठक भत्ता, प्रवास भत्ता नियमित द्यावा, दरमहा वेतन द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. या सर्व मागण्या व समस्यांवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोेले यांच्याशी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांच्या नेतृत्त्वात चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांनाही निवेदन पाठविण्यात आले.शिष्टमंडळात गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद ब्राम्हणवाडे, जिल्हा सचिव मुरारी दहीकर, नरेंद्र बनपुरकर, गणेश वनवे, योगराज नाकाडे, शालिक पुराम, अनिल कोठारे तसेच भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक