शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मासे व भाजीपाला उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:21 IST

राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले.

ठळक मुद्देशाश्वत शेती : आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांमुळे २१५४ एकर शेतीला सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले. शिवाय मत्स्यपालन व भाजीपाला लागवडीतही भरघोस वाढ झाली.शेततळ्यांमुळे खरीप व रबी हंगामातील पिकाला सिंचनाची सोय उपलब्ध झाली. एवढेच नव्हे तर आरमोरी तालुक्यातील शंकरनगर, देविपूर, वडधा या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील शेततळ्यात मत्स्यबीज टाकून मत्स्यपालनसुद्धा करून आर्थिकदृष्ट्या नफ्याची शेती केली आहे. शेततळ्यासाठी १२ आर क्षेत्र लागत असून शेततळ्याच्या पाळीवरील ६ आर जागेत तुरीचे पीक घेतले जात आहे. त्यामुळे शेततळ्यात अत्यल्प क्षेत्र कामी लागत आहे.शेततळ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडते. तसेच आवश्यकतेनुसार पिकाला पाणीसुद्धा देता येते. त्यामुळे शेततळे विविध पिकांसाठी वरदान ठरत आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणीसुद्धा शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मत्स्यपालनासह भाजीपाला लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत. तालुक्यातील १०३ गावांमध्ये शेततळ्यांचे काम झाले आहे.अपुºया व अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक अंतिम टप्प्यात पावसाअभावी नष्ट होते. अथवा अत्यल्प उत्पादन मिळते. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता शेतकºयांनी शासकीय योजनांच्या लाभातून सिंचन सुविधा निर्माण करावी.- एस. पी. ढोणे, तालुका कृषी अधिकारी., आरमोरी

टॅग्स :Waterपाणी