शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दारू, तंबाखू नियंत्रणासाठी कारवाईत वाढ अन् दंड करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 15:21 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश: जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात २७ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आढावा घेत संबंधित विभागांना दारू व तंबाखू नियंत्रणासाठी नियोजन करून कायद्यानुसार कृती व दंड करण्याचे आदेश दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, मुक्तिपथचे प्रभारी संचालक संतोष सावळकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या सल्लागार डॉ. कुथे, जि. प. आरोग्य विभागाचे डॉ. गोरे, आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयाचे पोरेड्डीवार, पोलिस विभाग एलसीबीचे उल्हास भुसारी, अन्न व औषध विभागाचे सुरेश तोरेम आदी प्रमुख अधिकारीसह इतर विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

यावेळी मागील बैठकीचा कार्यवृत्तांत व अनुपालन अहवालाचे वाचन किलनाके यांनी केले, तसेच मुक्तिपथ अभियानाचा कार्यवृत्तांत प्रभारी संचालक संतोष सावळकर यांनी सादरीकरण केले. अहवालातील मुद्यानुसार आढावा घेत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी उपस्थित विभागप्रमुख व प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या. बैठकीला कमलकिशोर खोब्रागडे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, अमरसिंग गेडाम, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या मीना दिवटे व दिनेश खोरगडे हजर होते.

अशी करा कृती... जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या पाहिजे. ज्या शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री केंद्र, पानठेले आहेत, ते शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने मुख्याध्यापकाने हटविले पाहिजे. जिथे समस्या सुटत नाही त्या ठिकाणी पोलिस तक्रार करून ते हटविले पाहिजे. शाळा परिसरात शालेय वेळेत व्यसन करताना आढळल्यास सदर नोडल ऑफिसरने, समितीने कोट्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला दंड करावा.

एसटी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घ्या... एस. टी. महामंडळाच्या चालक व वाहकांनी दारू, तंबाखू खरांचे व्यसन करू नये. आगार व्यवस्थापकाद्वारा चालक, वाहक व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करावी. मुक्तिपथ ग्रामपंचायत समितीने अवैध दारू व तंबाखू नियंत्रणासाठी कायदेशीर पद्धतीने ग्रामपंचायत पातळीला, गावात कृती करावी. सदर अहवाल ग्रामपंचायतनुसार बीडीओनी सीईओंना सादर करावा. अन्न औषध विभागाने सुगंधित तंबाखू विक्री विक्रेत्यावर कारवाया कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली