शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

काेराेनाकाळात घटले क्षयराेगाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

क्षयराेग हा पूर्णपणे बरा हाेणारा राेग आहे. मात्र त्याचे निदान व उपचार वेळीच हाेणे आवश्यक आहे. काेराेना व क्षयराेगाची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास काेराेनाची चाचणी केली जाते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याने काही रुग्ण तपासणी करून घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ७५० क्षयराेगाचे रुग्ण आढळून आले आहेत.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : क्षयराेगाचा (टीबी) संसर्ग हाेऊनही काेराेनाच्या भीतीने अनेक रुग्ण या राेगाचे निदान करण्यासाठी रुग्णालयापर्यंत जात नाहीत. तसेच काेराेना काळात बहुतांश नागरिक मास्कचा वापर करीत हाेते. यामुळे काेराेना काळात क्षयरुग्णांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात क्षयराेगाचे रुग्ण तुलनेने अधिक प्रमाणात आढळून येतात.काेराेनाच्या पूर्वी वर्षभरात साधारणत: १ हजार ८०० रुग्णांचे निदान हाेऊन त्यांच्यावर उपचार हाेत हाेते. आराेग्य विभागाने या राेगाबाबत जनजागृती केल्याने ग्रामीण भागातील नागरिकही या राेगाची लक्षणे दिसून आल्यानंतर उपचारासाठी उपकेंद्रातील परिचारिका, आशा वर्कर यांना कळवतात. जिल्ह्यातील सर्वच उपकेंद्रे, प्राथमिक आराेग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये यामध्ये उपचाराच्या सुविधा आहेत. तसेच एखाद्या खासगी डाॅक्टरकडे क्षयराेगाची लक्षणे असलेला रुग्ण गेल्यास त्याची तपासणी करून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवितात. क्षयराेग हा पूर्णपणे बरा हाेणारा राेग आहे. मात्र त्याचे निदान व उपचार वेळीच हाेणे आवश्यक आहे. काेराेना व क्षयराेगाची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास काेराेनाची चाचणी केली जाते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याने काही रुग्ण तपासणी करून घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ७५० क्षयराेगाचे रुग्ण आढळून आले आहेत. वर्षभरात हा आकडा १५०० पर्यंत पाेहाेचू शकताे. काेराेनाकाळापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. 

कशामुळे हाेतो क्षयराेग?

क्षयराेग हा मायक्राेबॅक्टेरिया या प्रकारच्या जिवाणूमुळे हाेतो. यामुळे फुफ्फुसाला बाधा निर्माण हाेते. क्षयराेग हा संसर्गजन्य राेग आहे. एक व्यक्ती दहा ते पंधरा व्यक्तींना संसर्ग करू शकते. क्षयराेगबाधित व्यक्ती बाेलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळ असलेल्या निराेगी व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीची राेगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास त्याला या राेगाची बाधा हाेते. 

काय आहेत लक्षणे...

एखाद्या व्यक्तीला सतत दाेन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खाेकला असणे, वजन कमी हाेणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु सायंकाळी ताप येणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे आदी लक्षणे दिसून येतात. 

वेळीच उपचार झाल्यास जिवाला धाेका नाहीक्षयराेगावर सरकारी रुग्णालयांमध्ये अतिशय प्रभावी औषधाेपचार माेफत स्वरूपात उपलब्ध आहेत. क्षयराेगाचे वेळीच निदान हाेऊन उपचार झाल्यास हा राेग पूर्णपणे बरा हाेतो. यासाठी सहा महिने औषध दिले जाते. सहा महिन्यांमध्ये हा राेग पूर्णपणे बरा हाेतो. मात्र रुग्णाची राेगप्रतिकारक क्षमता अतिशय कमी असल्यास, त्याला एखादा जुना गंभीर राेग असल्यास किंवा क्षयराेगाचे निदान हाेण्यास उशीर झाल्यास जिवाला धाेका हाेऊ शकतो. 

५०० रुपये आहार भत्ता मिळतोक्षयराेगाने बाधित असलेल्या व्यक्तीची राेगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी शासनाकडून प्रति महिना ५०० रुपये आहार भत्ता दिला जातो. तेवढी रक्कम संबंधित रुग्णाच्या खात्यावर जमा केली जाते. ही रक्कम साधारणत: सहा महिन्यांपर्यंत दिली जाते. 

शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयराेगावर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. मात्र या राेगाचे निदान हाेण्यास विलंब हाेता कामा नये. १९ जुलै ते ३१ ऑक्टाेबर या कालावधीत सक्रिय रुग्ण शाेधमाेहीम व नियमित संनियंत्रण उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आशा वर्कर्स घराेघरी जाऊन भेट देऊन विचारणा करणार आहेत. क्षयराेगाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तीने तपासणी करून घ्यावी. - डाॅ. सचिन हेमके, जिल्हा क्षयराेग अधिकारी, गडचिराेली

 

टॅग्स :Healthआरोग्य