नवेगाव रै. ग्रा. पं. : विविध दाखले प्राप्तीची माहिती मिळणारतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. ग्राम पंचायतीत महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश २०१५ च्या फलकाचे अनावरण सरपंच उषा दुधबळे यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. लोकसेवा अध्यादेश फलकामुळे नागरिकांना विविध दाखले प्राप्तीचा कालावधी व माहिती मिळण्यास मदत होणार आहे. अनावरण प्रसंगी उपसरपंच देवराव नैताम, तंटामुक्त समतीचे अध्यक्ष पांडुरंग भांडेकर,सचिव गायत्री वासेकर, रंजना कुनघाडकर, नरेंद्र सातपुते, अनिल दुधबळे, जोगेश्वर भांडेकर, वर्षा सातपुते, मीनाक्षी नैताम, पुष्पा खोबे, जोगेश्वर भांडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.लोकसेवा अध्यादेश फलकावर विविध दाखले, प्राप्तीचा कालावधी संबंधित अधिकारी यासह विविध माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दाखले त्वरित मिळण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)
लोकसेवा अध्यादेश बोर्डाचे उद्घाटन
By admin | Updated: November 22, 2015 01:28 IST