शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत वाघ-बिबट्यांनी घेतला तब्बल 26 जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने  व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे; परंतु पुन्हा पावसाळ्यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यात परत जात असत. मात्र, चार वर्षांपूर्वी देसाईगंज तालुक्यात दाखल झालेले वाघ हळूहळू जिल्ह्याच्या अनेक भागांत पसरून स्थायिक झाले आहेत.

गोपाल लाजूरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वनाच्छादित गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष सुरू झाला आहे. अलीकडच्या दोन वर्षांत तो अधिक वाढल्याचे दिसून येते. जानेवारी २०१९ पासूनच्या घटनांमध्ये या जिल्ह्यात २६ लाेकांचा वाघ व बिबट्यांनी बळी घेतला आहे. यामध्ये २१ जणांना वाघांनी, तर पाच जणांना बिबट्यांनी ठार केले. गडचिराेली जिल्ह्यात ७६ टक्के वनक्षेत्र आहेत. ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने  व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे; परंतु पुन्हा पावसाळ्यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यात परत जात असत. मात्र, चार वर्षांपूर्वी देसाईगंज तालुक्यात दाखल झालेले वाघ हळूहळू जिल्ह्याच्या अनेक भागांत पसरून स्थायिक झाले आहेत.२७ जानेवारी २०१९ राेजी आरमाेरी तालुक्याच्या उसेगाव येथील एका व्यक्तीला वाघाने ठार केल्याची पहिली घटना नोंदविल्या गेली. २० जानेवारी २०२२ राेजी आरमाेरी तालुक्याच्या कुरंझा येथे शेवटची व्याघ्रबळीची घटना घडली. गेल्या दोन महिन्यांत अशा घटनांची नोंद नसली तरी तीन वर्षांत २१ जणांचा वाघाने आणि ५ जणांचा बिबट्याने बळी घेतला. त्यात वन विभागाच्या क्षेत्रात १८, वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम)च्या क्षेत्रात ७, तर आलापल्ली वन्यजीव क्षेत्रातील एका घटनेचा समावेश आहे.

काेणत्या कारणांनी गेला बळी?-    गडचिराेली जिल्ह्यात भरपूर प्रमाणात वनक्षेत्र असल्याने वनाेपजावर लाेकांचे जीवन अवलंबून आहे. माेहफूल वेचणी, सरपण गाेळा करणे, गुरे चारणे, तेंदूपत्ता संकलन, तसेच जंगलालगतीची शेती कसत असताना त्यांचा जंगलाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येतो. सर्वाधिक बळी सरपण गाेळा करताना आणि शेतातील कामासाठी जात असताना किंवा शेतात कामे करीत असताना वाघांनी घेतला.-    देसाईगंज, गडचिराेली, आरमाेरी तालुक्यात आढळणारे वाघ आता आलापल्ली व सिराेंचापर्यंत सुद्धा पाेहाेचले आहेत.

किती जणांना मिळाले १५ लाख?वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत २६ बळींपैकी आतापर्यंत २४ जणांना १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. मुलचेरा तालुक्यातील येल्ला व सिराेंचा तालुक्यातील पेंटिपाकातील बिबटबळीच्या कुटुंबाच्या अनुदानाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ