शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पहाटेच्या डुलकीने केला घात, मिरची मजुरांचे वाहन खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 22:12 IST

Gadchiroli News मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात मिरची ताेडण्यासाठी जात असलेल्या मजुरांचे वाहन आष्टीपासून दाेन किलोमीटर अंतरावर असलेल्या अनखोडा नाल्याजवळील वळणावर उलटले. हा अपघात शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातून तेलंगणात जाताना अपघात२० जखमी, ५ गंभीर

गडचिरोली : मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात मिरची ताेडण्यासाठी जात असलेल्या मजुरांचे वाहन आष्टीपासून दाेन किलोमीटर अंतरावर असलेल्या अनखोडा नाल्याजवळील वळणावर उलटले. हा अपघात शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडला. यात चालक, क्लिनरसह २० मजूर गंभीर जखमी झाले. त्यातील ५ गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, मंडला जिल्ह्यातील मजूर गडचिरोली-आष्टीमार्गे तेलंगणा राज्यात सी. जी. ०९, जेजे ४८०० क्रमांकाच्या क्रुझर वाहनाने जात हाेते. रात्रभराचा प्रवास झाल्यानंतर पहाटे अनखोडाजवळील वळणावर चालकाचा थोडी डुलकी आली आणि त्याचा भरधाव वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे हे वाहन २०० मीटर दूर जाऊन खड्ड्यात उलटले.

वाहनात मिरची तोडणारे १७ मजूर तसेच चालक, क्लिनर व अन्य एक व्यक्ती बसली हाेती. शिक्षक संतोष नागरगोजे व इतर नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढले. पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, राजू पंचफुलिवर, भाऊ फुंडगिर या पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सामाजिक कार्यकर्ता संजय पंदिलवार यांनी रुग्णालयात जाऊन गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यासाठी दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करून दिली.

 

टॅग्स :Accidentअपघात