शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत सात गावांमध्ये नक्षल्यांना गावबंदी, नक्षल्यांचा गड असलेल्या गावांनी दाखवली हिंमत

By दिगांबर जवादे | Updated: June 16, 2024 16:19 IST

नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही!

दिगंबर जवादे, गडचिराेली: नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलामार्फत विविध शासकीय याेजनांचा लाभ दिला जात आहे. भामरागड तालुक्यातील धोडराज येथे कृषी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावांतील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षल्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव धाेडराज पाेलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे सादर केला.

नक्षल्यांना बंदी घातलेली सातही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर स्थित आहेत. माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसरात ही गावे येतात. या गावांमध्ये नक्षलवाद्यांचे वर्चस्व होते, तसेच गावातील काही सदस्यांचा नक्षलवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. मागील तीन वर्षांमध्ये गडचिरोली पोलिस दल, पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे आयाेजित केले. येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यात यशस्वी झाल्याने पोलिस दलाच्या प्रति गावक­ऱ्यांचा विश्वास दृढ झाला. अलीकडील काळात या परिसरात इरपनार येथे मोबाइल टॉवरची उभारणी करण्यात आली.

नक्षलवाद्यांकडून पोलिस खब­ऱ्या असल्याच्या संशयावरून निष्पाप गावक­ऱ्यांच्या हत्या व मारहाण केली जात हाेती. नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक आदी घटनांमुळे नक्षलवादी जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून १४ जून रोजी धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये वरील सात गावांतील गावक­ऱ्यांनी नक्षल गावबंदी ठराव संमत केला.सदरची कार्यवाही यशस्वीरीत्या पार पाडण्यास भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, पोलिस स्टेशन धोडराजचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी काैतुक केले आहे.

नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही!

कोणत्याही नक्षलवादी संघटनेस जेवन, रेशन, पाणी देणार गावकऱ्यांमार्फत दिले जाणार नाही. त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही. गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना नक्षलवादी संघटनेत सहभागी करून घेणार नाही. त्यांचे कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही. नक्षलवाद्यांच्या मिटिंगला जाणार नाही. त्यांच्या खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असे ठरावात म्हटले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली