शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात दाेन हजार हेक्टर क्षेत्रावर भडकला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 21:05 IST

Gadchiroli News गडचिराेली जिल्ह्यात २ हजार ३० हेक्टर क्षेत्रावरील जंगलाला आग लागली आहे. आगीमुळे जैवविविधतेचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देमाेहाफुलांचा हंगाम सुरू हाेताच लागली आग

गडचिराेली : फेब्रुवारी ते मार्च या दाेन महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ९२२ फायर अलर्ट प्राप्त झाले आहेत. यामध्ये २ हजार ३० हेक्टर क्षेत्रावरील जंगलाला आग लागली आहे. आगीमुळे जैवविविधतेचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गडचिराेली जिल्ह्यात माेहाची झाडे माेठ्या प्रमाणात आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून माेहाफुले पडण्यास सुरुवात हाेते. त्यापूर्वी पानझड झाली असल्याने झाडाखाली माेठ्या प्रमाणात पाने जमा हाेतात. या पानांना आग लावली जाते. त्यामुळेच मार्च महिन्यात आगीच्या सर्वाधिक घटनांची नाेंद होते. विशेष म्हणजे ही आग पुढे कित्येक हेक्टर क्षेत्रावरील जंगलात पसरते. आगीमुळे लहान राेपटी नष्ट हाेतात. तसेच वन्यजीव, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची घरटे नष्ट हाेतात. याचा फार माेठा फटका जैवविविधतेला बसतो.

जागृती करूनही लावतात आगी

माेहाच्या झाडाखाली लावलेली आग पुढे जंगलात पसरते. यामुळे जैवविविधतेचे माेठे नुकसान हाेते. लाेकांनी आग लावू नये, याबाबत वनविभागामार्फत दरवर्षी जागृती केली जाते. झाडाखालील पालापाचाेळा झाडून दूर केले तरीही माेहाफुले वेचता येतात. मात्र, नागरिक असे न करता थेट आगी लावतात.

सॅटेलाईट अलर्टने माेठी मदत

एखाद्या ठिकाणी आग लागल्यास याबाबतचा संदेश सॅटेलाईटमार्फत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविला जाते. हा संदेश पुढे ज्या वनक्षेत्रात आग लागली आहे तेथील वनकर्मचाऱ्याला पाठविला जातो. त्यानंतर वनकर्मचारी त्या ठिकाणी पाेहाेचून आग विझवितात. सॅटेलाईटच्या संदेशामुळे आग वेळीच विझविणे शक्य झाले आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत कमी फायर अलर्ट

वनविभागाने ३१ मार्च राेजी आढावा घेतला असता, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फायर अलर्टची संख्या निम्म्याहून कमी असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी ३१ मार्चपर्यंत १६ हजार ९९१ फायर अलर्ट प्राप्त झाले हाेते. यावर्षी फायर अलर्टची संख्या ६ हजार ९२२ एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १० हजार ६९ फायर अलर्ट कमी आहेत.

कारवाईची गरज

जे नागरिक जाणूनबुजून आग लावतात, अशांवर कारवाई करणे गरजेचे आहे. कारवाई हाेत नसल्याने नागरिक आगी लावतात. यानंतर आता तेंदूपत्त्यासाठी आगी लावल्या जाणार आहेत.

 

टॅग्स :fireआग