शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST

गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड ...

गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सदर योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.

बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा

आरमाेरी : शहरात विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून, अनेक जण बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र, याकडे नपचे दुर्लक्ष आहे.

दुर्गम भागात कर्मचारी राहतच नाहीत

गडचिराेली : तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्यांच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहतच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.

निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त

कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने, गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.

हूक टाकून विजेची चोरी सुरूच

मुलचेरा : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.

लिलावाअभावी वाहने गंजण्याची शक्यता

गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यांमध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.

शहरातील नाल्या गाळाने बुजल्या

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच अच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.

सिरोंचा तालुक्यातील बस थांब्यांची दुर्दशा

सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाले आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.

अहेरी शहरातील अतिक्रमण कायमच

अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केव्हा हाेणार

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील वन्यपशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.

हगणदारीमुक्तीवर प्रश्नचिन्ह

कुरूड : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी, शौचालये निकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याकडेला जातात.

अल्पवयीन चालकांवर कारवाई नाही

आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचा या समस्येकडे कानाडाेळा हाेत आहे.

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था

कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येतात. स्मशानभूमीचा विकास करावा, अशी मागणी आहे.

इंदिरा गांधी चाैकात स्वच्छतागृह द्या

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.