शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची प्रतिमा स्वच्छ असायला हवी; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं विधान, गडचिरोली पोलिसांचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 22:25 IST

राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले वातावरण आणि अशात आपल्याकडे आलेली गृहमंत्री पदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान आहे

नागपूर : राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले वातावरण आणि अशात आपल्याकडे आलेली गृहमंत्री पदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना नोंदवले.गृहमंत्र्यांचा पदभार सांभाळल्यानंतर वळसे पाटील पहिल्यांदाच नागपुरात आले. आज सकाळी गडचिरोलीत  घडलेल्या चकमकीचे वृत्त कळताच ते तिकडे गेले. सायंकाळी गडचिरोलीतून परतल्यानंतर त्यांनी स्थानिक शीर्षस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर पोलीस जिमखाण्यात पत्रकारांशी अनोपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, सध्या राज्य पोलीस दलात एका वेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा प्रामाणिक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तरच नागरिक त्यांच्यावर विश्वास करतील. त्यांचा हा कटाक्ष राज्य पोलिस दलातील भ्रष्टाचाराचे आरोप जडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधाने होता.  

आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्याच्या संबंधाने लागलेले आरोप-प्रत्यारोप आणि घडणाऱ्या घडामोडी या संबंधाने गृहमंत्री वळसे-पाटील फारसे बोलले नाही. मात्र कोरोनामुळे राज्य एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. अशात आपल्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी येणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले. अभ्यास आणि नियोजन करून आपण पोलीस विभागासाठी काही नवीन उपाय योजना अमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.नागपुरात शारीरिक दुखापतीचे गुन्हे जास्त आहेत. मात्र, पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले. पोलीस भरतीसाठी तीन लाख अर्ज आले. भरती प्रक्रियेच्या संबंधाने लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार हजर होते.गडचिरोली पोलिसांचे कौतुक २१ मे २००९ रोजी नक्षल्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. गडचिरोली पोलिसांनी केलेली आजची ही कारवाई बदला नव्हे, तर एक योगायोग आहे. नक्षल्यांना कंठस्थान घालणाऱ्या आजच्या कारवाईबद्दल त्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलGadchiroliगडचिरोली